राजुरा २६ मे:- राजुरा तालुक्यातील सास्ती या गावातील इयत्ता पहिली ते दहावी पर्यंत एकत्रित शिक्षण घेतलेले आणि २००२ मधे दहावीची परीक्षा उत्तीर्ण होऊन वेगवेगळ्या क्षेत्रात गेलेले हे विध्यार्थी तब्बल तेवीस वर्षांनी एकत्रित येऊन राजुरा येथील मध्य चांदा वनविभागाच्या निसर्ग निर्वाचन केंद्र परिसरात स्नेहमिलन सोहळ्या निमित्याने एकत्रित आले.
Students from Sasti village came together after twenty-three years.
आपल्या व्यस्त जीवनात आणि अत्यंत धकाधकीच्या आयुष्यात थोडासा वेळ मैत्रीकरीता व माणुसकी जपण्याकरिता द्यावा असे आवाहन ममता लांडे - मोरे माजी विद्यार्थीनी यांनी केले. सर्वांनी एकत्रित येऊन आपल्यातील कलागुणांना, जुन्या- नव्या अविस्मरणीय आठवणींना उजाळा देत आपल्यापैकी कोणाच्याही आयुष्यात कधीही कोणतीही अडचण आल्यास सर्वांनी त्याला मदत करण्याचा संकल्प केला. Reunionयावेळी नागपूर, चंद्रपूर, कोरपणा, गडचांदूर, राजुरासह इतर ठिकाणांहून विध्यार्थी एकत्रित आले. प्रविण वैरागडे, ममता लांडे, प्रज्ञा जुमडे, सीमा नळे , शितल पत्तीवार , सुनिता मोहितकर, किशोर देरकर, अनिता जिवतोडे, शंकर खवसे , अनिल मोहितकर, प्रमोद माथनकर, निलम मेश्राम, वासुदेव जीवतोडे, गजानन गौरकार, प्रकाश बुटले, परमेश्वर सिंगाराव, अमोल आवळे, सचिन शेंडे, छबुताई अतकारे, किशोर काळे, मनिषा बेले, नितु चन्ने, संजीवनी वानखेडे, अर्चना लोहबडे, अनिता खणके , वर्षा बोढाले , साधना चोखारे , संजय गोनेलवार आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती. मनोरंजनात्मक खेळ, आठवणींना उजाळा , मनोगत, अगदी साध्या पद्धतीने झुणका भाकरी चा आस्वाद घेत काही क्षण आपल्या मैत्रिकरिता देण्यात आले . अतीशय निसर्गरम्य अश्या परिसरात जमलेल्या विद्यार्थांनी तेवीस वर्षांनी सुद्धा आपली मैत्री जपत स्व गावाच्या आठवणी जपत स्नेहमिलन सोहळा पार पाडला.
---------------------------------------------
ममता लांडे- मोरे, सास्ती गावातील माजी विद्यार्थीनी
अत्यंत धावपळीच्या युगात मैत्रीला काळीमा फासणारी घटना घडल्यावर हळहळ व संताप व्यक्त होताना आपणं बघतो. परंतू आम्ही सास्ती या गावातील सर्व विध्यार्थी तेवीस वर्षांपासून आपले मैत्रीचे पावित्र्य जपून आज एकत्रित येऊन आपल्यातील सुख दुःख, चांगले - वाईट अनुभव, जुन्या आठवणींना उजाळा देण्यासाठी स्नेहमिलन सोहळ्यात उपस्थीत झाले याचा मला मनस्वी आनंद आहे.
0 comments:
Post a Comment