Ads

नगर परिषद भद्रावती मार्फत नागरिका करिता थंड पाणपोई सुविधा

जावेद शेख भद्रावती प्रतिनिधी :-
दिनांक १ मे २०२५ महाराष्ट्र दिन व कामगार दिनाचे औचित्य साधून नगरपरिषद भद्रावती मार्फत नगरपरिषद कार्यालय शेजारील सेवादल मैदानात थंड पाण्याची पाणपोईचे उद्घघाटन करण्यात आले.
Cold water supply facility for citizens through Bhadravati Municipal Council
सदर पानपोई नगर परिषद निधीतून उभारण्यात आलेली असून शासनाच्या शंभर दिवस कार्यक्रमांतर्गत त्याची अंमलबजावणी करण्यात आलेली आहे. सदर उद्घाटन झालेल्या पानपोई सारख्या अजून तीन पानपोई शहरातील नाग मंदिर परिसरात, भाजी मार्केट परिसरात ,व नवीन बस स्थानक परिसरात लावण्यात येनार असल्याची माहिती नगरपरिषदेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक डॉ. विशाखा शेळकी यांनी दिली. सदर पानपोई च्या उद्घाटनास माजी नगराध्यक्ष मा. श्री.अनिल भाऊ धानोरकर, माजी उपाध्यक्ष श्री. प्रफुल भाऊ चटकी, माजी नगरसेवक श्री प्रशांत डाखरे, माजी नगरसेवक श्री.राजू सारंगधर व माजी नगरसेविका श्रीमती सरिता सूर, तसेच शहरातील नागरिक व समस्त नगर परिषद कर्मचारी वृद उपस्थित होते. सदर पाणपोई उभारण्याकरिता पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख श्री. निलेश रासेकर, श्री दिनेश मासिरकर श्री.दुर्योधन गोऊत्रे व श्री.रवि जिडगीलवार यांनी परिश्रम घेतले.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment