जावेद शेख प्रतिनिधी भद्रावती :
नुकत्याच जाहीर झालेल्या दहावी सीबीएसई परीक्षेत शहरातील फेरीलैंड स्कूल अँड कॉलेजचा विद्यार्थी आदर्श हितेंद्र चव्हाण हा 99% गुण प्राप्त करीत चंद्रपूर जिल्ह्यात प्रथम आलेला आहे. त्याचा सत्कार फेरीलँड शाळेत दिनांक 14 रोज बुधवार ला करण्यात आला.
The model of Fairyland School in Bhadravati is the first in Chavan district.
यावेळी शाळेचे अध्यक्ष अड. युवराज धानोरकर,प्राचार्या वर्षा धानोरकर, उपप्राचार्या अर्चना धोटे, व्यवस्थापक कुमुद पोईनकर, मानसी बोटूवार, संतोष निकेसर, शैलेब सोनकर, विद्या कांबळे, मंजुषा दाते, किरण बनकर, स्वरूपा पाटील, प्रज्ञा ठाकरे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी आदेश चव्हाण याचा शाल, श्रीफळ ,पुष्पगुच्छ व मिठाई देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी शाळेच्या इतर यशस्वी विद्यार्थ्यांचाही सत्कार करण्यात आला.आदेशने आपल्या यशाचे श्रेय आपले आई-वडील व शिक्षकांना दिले. शाळेतर्फे आदेश चे अभिनंदन करण्यात आले असून त्याला त्याच्या पुढील शैक्षणिक वाटचालीबद्दल शुभेच्छा देण्यात आल्या.
0 comments:
Post a Comment