Ads

राजुरा - तेलंगणा मार्गावर धानाचा ट्रक पलटला; वाहतूक व्यवस्था विस्कळीत

राजुरा : राजुरा - तेलंगणा मार्गावरील सुमठाना फाट्याजवळ गुरुवार ला दुपारच्या सुमारास धानाने भरलेला ट्रक पलटल्याची घटना घडली. या अपघातामुळे मार्गावरील वाहतूक काही काळासाठी ठप्प झाली. विशेषतः मोठ्या अवजड वाहनांची आणि बससेवेची मोठी गैरसोय झाली. Road Accident
Paddy truck overturns on Rajura-Telangana road; traffic disrupted
अपघातानंतर ट्रक मधील धानाचे पोते रस्त्यावर विखुरले गेले होते. यामुळे दोन्ही बाजूंनी वाहतूक अडकून राहिली. घटनेची माहिती मिळताच वाहतूक पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. नागरिकांच्या मदतीने त्यांनी काही धानाची पोती बाजूला केली आणि चारचाकी वाहनांना मार्ग करून दिला. परिणामी, हलकी वाहने मार्गक्रमण करू शकली, मात्र ट्रक, बस आणि इतर अवजड वाहने तिथेच अडकून पडली होती.

या अपघातामुळे प्रवाशांना मोठ्या प्रमाणावर अडचणींना सामोरे जावे लागले. काही प्रवासी पर्यायी मार्गांचा वापर करून गंतव्यस्थानी पोहोचले, तर काहींना दीर्घ काळ प्रतीक्षा करावी लागली. घटनेमुळे स्थानिक पातळीवर वाहतूक व्यवस्थेची पुन्हा एकदा कसोटी लागली असून, अशा अपघातांच्या वेळी अधिक तत्पर आणि सुसज्ज यंत्रणेची गरज असल्याचे अधोरेखित झाले आहे.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment