Ads

निर्माणी वसाहतीत 12 फूट अजगर आढळला.

भद्रावती जावेद शेख:-
एरवी वाघ, बिबट्यांचे नित्य दर्शन होत असलेल्या शहरातील आयुध निर्माणी वसाहतीत एका 12 फूट लांबीच्या अजगराने हजेरी लावली. या अजगराला सर्पमित्रांनी पकडून त्याला त्याच्या सुरक्षित अधिवासात मोकळे केले.
A 12-foot python was found in a construction site.
आयुध निर्माणी वसाहतीतील सेक्टर सहा मध्ये असलेल्या इंद्रप्रस्थ गार्डनच्या अगदी प्रवेशद्वारावरच हा अजगर आढळून आला. याची माहिती सर्पमित्र अनुप येरणे व आशिष चहाकाटे यांना देण्यात आल्यानंतर त्यांनी आपले सहकारी श्रीपाद भाकरे, बंटी मंडल व इम्रान खान शैलेश पारेकर,यांचेसह घटनास्थळी जाऊन या अजगरास ताब्यात घेतले व त्याला जंगलातील सुरक्षित अधिवासात निसर्ग मुक्त केले. विशेष म्हणजे या गार्डनमध्ये लहान मुले नेहमी खेळत असतात.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment