Ads

हायवा ट्रकने रेती तस्करी करणाऱ्या आरोपीस भद्रावती पोलिसांनी केली अटक

जावेद शेख भद्रावती :- sand Smugglingसध्या जिल्ह्यात रेती घाटाचे लिलाव झालेले नसताना अवैद्य रेतीची वाहतूक रात्र दिवस सुरू आहे
भद्रावती पोलिसांनी हिवा ट्रक क्रमांक एमएच ३४ एम ६३४९ चा चालक प्रवीण सदुजी अमृतकर, रहिवासी बाबुपेठ याला सुमठाणा येथून वाळू चोरी करताना रंगेहाथ पकडले. पोलिसांनी हिवा ट्रकसह ४.७५ लाख रुपयांचा माल जप्त केला आहे.
Bhadravati police arrest accused of smuggling sand using a highwa truck
आज दिनांक 04/06/25 रोजी रात्र गस्त दरम्यान पहाटे 03.30 ते 4/00 वाजता दरम्यान पोलिस उपनिरीक्षक प्रियंका गेडाम सोबत पोलिस अंमलदार हरिश्चंद्र नन्नावरे, ड्रायव्हर पोलिस हवालदार जगदीश जीवतोडे असे सरकारी वाहनाने पेट्रोलिंग करीत असताना विश्वकर्मा मंगल कार्यालय जवळ,सुमठाणा भद्रावती येथे एक हायवा रेती भरलेलाट्रक क्रमांक MH.34.M.6349 हा रेती खाली करीत असतांना दिसला तेव्हा सदर ट्रक चालकास थांबवून खाली केलेल्या रेती बाबत विचारले असताचालक याने उडवाउडवी ची उत्तरे दिली व रॉयल्टीचे कागदपत्राबाबत विचारले असता कोणतीही वैध कागदपत्रे नसल्याचे सांगितले... सदरची रेती ही अवैधरित्या वाहतूक करतांना मिळून आल्याने हायवा ट्रक क्रमांक MH.M.6349 चे चालक आरोपी नाम प्रवीण सदुजी अमृतकर, वय 35 वर्षे, रा. बाबूपेठ, चंद्रपूर याचेविरुध पो स्टे भद्रावती येथे रेती चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला.
याबाबत चालक प्रवीण सदूजी अमृतकर (३५) यांना विचारणा केली असता त्यांनी सांगितले की, हिवा ट्रक बाबुपेठ येथील रहिवासी निशांत आंबटकर यांचा आहे. तो त्यानें भाड्याने घेतला होता. बांधकाम कामासाठी चंद्रपूरच्या इराई नदीतून वाळू आणून विश्वकर्मा सभागार सुमठाणा येथे टाकण्याचे त्यांना सांगण्यात आले आहे.

रेतीच्या अवैद्य तस्करी करणाऱ्या मूळ मालकास भद्रावती पोलीस कारवाई करणार का असा प्रश्न नागरिक करीत आहे

Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment