Ads

ट्रॅक्टर खाली दबून युवकाचा मृत्यू

सादिक थैम तालुका प्रतिनिधी
वरोरा: तालुक्यातील सात की.मी.अंतरावर असलेल्या करंजी रेती घाटावरून ट्रॅक्टर मागे आल्याने युवकाचा तोल गेला ,आणि ट्रॅक्टर खाली येऊन युवकाचा.या मृत्यू झाला.सदर घटना ६जून२०२५ ला सायंकाळी चार वाजताचे सुमारास घडली.मृतकाचे नाव आशिष देवराव बोढे वय २६ वर्ष आहे.
Youth dies after being crushed under tractor
तालुक्यातील तूलाणा व करंजी असे महत्वाची रेती घाट आहे.सदर रेती डेपो हे सार्वजनिक बांधकाम विभागाला मिळाली आहे.याध्ये तुलाणा घाटाची रेती ही बांधकाम विभागाच्या शासकीय कामाकरीता आहे.परंतु संबंधित ठेकेदार नियमांचे उल्लघन करून रेती खुल्या बाजारात विकल्या जात असल्याचे चित्र दिसून येत आहे. करंजी घाट बंद आहे,परंतु घरकुल लाभार्थ्यांना महसूल विभागाकडून रेती वाटप करण्याचा शासन निर्णय असल्यामुळे रेती वाटप सुरु आहे.यातच खाजगी लोक रेतीचा उपसा करून कोपऱ्या कापऱ्यात रेतीचे साठे करून ठेवत आहे.शहरी व ग्रामीण भागात रेती साठे असून नेमकी ही रेती येथे कुठून ?प्रशासनाची मुक संमती आहे का?असे प्रश्न निर्माण होत आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने घालवून दिलेल्या अटी व शर्ती पूर्ण केल्याशिवाय रेती उत्खनन अथवा उपसा करता येत नाही.तरी सुद्धा लेबर लावून करण्याचा नियम असून पोकलेन मशिनद्वारे रेती उपसा केली जातात.रेती घाटावर सी सी टी व्ही लावणे अनिवार्य असताना त्याची पूर्तता झाली नाही. तसेच खुल्या बाजारात रेती विकता येत नाही या नियमाला बगल देवून सर्रासपणे खुल्या बाजारात रेती विकल्या जात आहे.रेती चोरीवर अंकुश ठेवण्यासाठी तहसीलदारांनी पथक गठित केले.परंतु पथक कुचकामी ठरल्याचे दिसून येत आहे.रेती साठवणूक करता येत नसताना खाजगी घरांची कामे सुरू असून त्या कामांवर मोठ मोठे रेतीचे साठे दिसून येत आहे.
मग सदर रेती नेमकी येते कुठून असाही प्रश्न उपस्थित होत आहे.
घरकुल धारकांनी आपापल्या वाहनांनी मोफत रेती घेऊन जाण्याचा नियम आहे.त्याअनुषंगाने घरकुलधारक ट्रॅक्टर किरायाने घेऊन वाहतूक करीत आहे.७जून ला ट्रॅक्टर रेती भरून रेती घाटातून निघत नसल्याने विजय ठेंगणे यांच्या ट्रॅक्टर वरील आशिष देवराव बोढे वय २६ हा ट्रॅक्टर काढण्यासाठी गेला असता ट्रॅक्टर ची ट्रॉली तुटल्याने ट्रॅक्टर उलटला आणि त्याखाली युवक आला.युवक गंभीर रित्या जखमी झाला त्यास त्वरित उपचारार्थ रुग्णालयात दाखल करण्यात आले.परंतु रात्रौ ११ वाजता त्याचा मृत्यू झाला.सदर ट्रॅक्टर टेमुर्डा येथील विक्की साळवे यांच्या मालकीचा आहे अशी माहिती असून घटनेचा पुढील तपास वरोरा पोलीस स्टेशन चे पोलीस अधिकारी करीत आहे.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment