जावेद शेख भद्रावती प्रतिनिधी
भद्रावती:-काही दिवसांपूर्वी शहरातील सुरक्षा नगर येथे घरफोडी करून रोख रकमेसह सोने-चांदीचे दागिने चोरणाऱ्या आरोपीस भद्रावती पोलिसांनी अटक केली आहे.
Accused of burglary in Suraksha Nagar arrested.
प्रमोद उर्फ मोबाईल अरुण गेडाम, वय 32 वर्ष, राहणार रासा घोंसा असे या अटकेत असलेल्या आरोपीचे नाव आहे. सदर आरोपी चोरीचा प्रयत्न करीत असताना भद्रावती पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले होते. त्याची चौकशी केल्यानंतर सुरक्षा नगर येथे घरफोडी केली असल्याची त्याने कबुली दिली. सदर चोरीच्या घटनेत सोने-चांदीचे दागिने व रोख रक्कम असा एकूण दोन लक्ष 50 हजार 100 रुपयाचा मुद्देमाल चोरीला गेला होता. सदर आरोपीने आणखी तीन घरफोडी केल्याचे तपासा दरम्यान निष्पन्न झाले. सदर मुद्देमाल आरोपी जवळून हस्तगत करण्यात आला.सदर कारवाई ठाणेदार योगेश पारधी यांच्या नेतृत्वात वीरेंद्र केदारे, गजानन तुपकर, महेंद्र बेसरकर, अनुप आष्टुनकर, जगदीश झाडे, विश्वनाथ चुदरी, खुशाल कावळे, योगेश घाटोळे, भूषण चौधरी यांनी केली.
0 comments:
Post a Comment