चद्रपुर :-दिनांक २६/०७/२०२५ रोजी चंद्रपूर शहरातील पोलीस स्टेशन रामनगर हद्दीत Mephedrone Drug हा अमली पदार्थ विक्री करण्याकरीता वाहतुक करीत असल्याचे गोपनिय माहितीचे आधारावरुन स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूर चे पथकाने सापळा रचुन
Local Crime Branch, Chandrapur arrests two accused for selling Mephedrone Drug
ड्रग्स विक्री करण्याकरीता वाहतुक करणारा आरोपी क्रमांक (१) राहुल अनिल पवार वय २८ वर्ष रा. एमईएल चंद्रपूर व ड्रग्स पुरविणारा आरोपी (२) चिनु महेश गुप्ता वय १८ वर्ष ६ महिने रा. महाकाली कॉलरी चंद्रपूर यांना ताब्यात घेवुन त्यांचेकडुन एकुण ०५.०० ग्रॅम Mephedrone Drug हा अमली पदार्थ आणि वाहनासह इतर मुद्देमाल असा एकुण ६,४०,०००/- रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असुन सदर गुन्हयात वरील नमुद दोन आरोपी व पाहिजे असलेला आरोपी (३) आकाश गुप्ता रा. महाकाली कॉलरी चंद्रपूर यांचेविरुध्द पोलीस स्टेशन रामनगर येथे अपराध क्रमांक ६०४/२०२५ कलम ८ (क), २२ (ब), २९ एन.डी.पी.एस. अॅक्ट अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. गुन्हयाचा पुढील तपास रामनगर पोलीस करीत आहे.सदरची कारवाई श्री मुम्मका सुदर्शन, पोलीस अधीक्षक चंद्रपूर, श्री ईश्वर कातकडे, अपर पोलीस अधीक्षक चंद्रपूर यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर चे पोलीस निरीक्षक श्री अमोल काचोरे यांचे नेतृत्वात सपोनि श्री दिपक कॉक्रेडवार, सपोनि श्री बलराम झाडोकार, पोउपनि श्री संतोष निंभोरकर, पोउपनि श्री सर्वेश बेलसरे, पोहवा संतोष येलपुलवार, दिनेश अराडे, नितीन रायपुरे, सचिन गुरनुले, गणेश मोहुर्ले, दिपक डोंगरे, पोअं मिलींद जांभुळे, शंशाक बदामवार, सुमित बरडे सर्व स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर यांनी केली आहे.
0 comments:
Post a Comment