राजुरा (ता.प्र) :-राजुरा तालुका हा वनक्षेत्राने वेढलेला तालुका म्हणून ओळखला जातो. या तालुक्यात शेती व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या मोठया प्रमाणात आहे. सध्या तालुक्यामध्ये शेतीमध्ये वन्यप्राणी धुडगूस घालून उभ्या शेतपिकांची नासधुस मोठ्या प्रमाणात होत आहे.
Provide immediate compensation to farmers affected by wildlife damage: Shantanu Dhote.
त्यामुळे शेतकरी आपल्या शेतपिक नुकसान भरपाईसाठी आपल्या विभागाला अर्ज सुद्धा करीत आहेत. व आपल्या विभागाने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या शेतपिकांचे पंचनामे सुद्धा केले आहे. परंतु या भागातील शेतकरी लोकांना अजून पर्यंत नुकसान भरपाईची रक्कम मिळालेली नाही. त्यामुळे राजुरा तालुक्यातील वन्यप्राण्यांच्या नासधुसीने नुकसानग्रस्त शेतकर्यांना तातडीने नुकसान भरपाईच्या देण्यात यावी अशी मागणी चंद्रपूर जिल्हा युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शंतनू धोटे यांनी वनपरिक्षेत्र अधिकारी राजुरा यांच्याकडे केली आहे. यासंदर्भात जिल्हाध्यक्ष शंतनू धोटे यांच्या मार्गदर्शनाखाली राजुरा युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष इर्शाद शेख यांच्या नेतृत्वात राजुरा युवक काँग्रेस शिष्टमंडळाच्या वतीने राजुराचे वनपरिक्षेत्र अधिकारी गजानन इंगळे यांची प्रत्यक्ष भेट घेऊन निवेदनाद्वारे वरील मागणी करण्यात आली आहे. यावेळी चंद्रपूर जिल्हा युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शंतनू धोटे, राजुरा युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष इर्शाद शेख, ओबीसी काँग्रेसचे धनराज चिंचोलकर, जिल्हा युवक काँग्रेसचे महासचिव प्रणय लांडे, सरपंच अमित टेकाम, दिलीप राऊत, मनोज मडावी यासह युवक काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते.
0 comments:
Post a Comment