चंद्रपूर :
कोहिनूर ग्राउंडवर नागरिकांच्या सुविधेसाठी बसविण्यात आलेल्या ट्रेकिंग व वॉकिंग ट्रॅकवरील पेव्हर्स अर्बन एनवायरो कंपनीने चोरून स्वतःच्या कामात वापरले, तसेच माता महाकाली महोत्सवासाठी वापरण्यात आलेली गिट्टी सुद्धा बेकायदेशीररीत्या तिथून चोरून नेली, असा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे.
Action taken against Urban Enviro Company in Kohinoor Lake pavers theft case – Aam Aadmi Party's demand succeeds
या संदर्भात आम आदमी पार्टीचे युवा जिल्हाध्यक्ष राजू कुडे यांनी सर्व पुराव्यासकट तक्रार चंद्रपूर महानगरपालिका आयुक्तांकडे दाखल केली होती. तक्रारीनंतर महानगरपालिकेने विशेष चौकशी समिती नेमून तपास केला असता कंपनी दोषी आढळली.
त्यानुसार, अर्बन एनवायरो कंपनीवर रु. ८,८९,०००/- पेक्षा अधिक दंडात्मक कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत. आम आदमी पार्टीने सदर कंपनीला ब्लॅकलिस्टमध्ये टाकून तिच्यावर तात्काळ एफ.आय.आर. दाखल करण्याची मागणी केली आहे.
राजू कुडे यांनी स्पष्ट केले की, "जनतेच्या पैशांचा अपव्यय व सार्वजनिक मालमत्तेची चोरी करणाऱ्या कंपन्यांना केवळ दंड नव्हे तर कठोर शिक्षा मिळाली पाहिजे. दोषींना कायद्याच्या कचाट्यात आणण्यासाठी आम आदमी पार्टी शेवटपर्यंत लढणार आहे."
आम आदमी पार्टीने शहरातील अशा प्रकारच्या भ्रष्टाचार व बेकायदेशीर कृत्यांवर कठोर पावले उचलण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.
0 comments:
Post a Comment