Ads

भिसी पोलीसांची धडक कारवाई

भिसी | प्रतिनिधी:-
भिसी पोलीसांनी अवैध दारू विक्रेत्याविरुद्ध कारवाई करत ८९,२०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. यामध्ये देशी दारूचा साठा व एक मोटारसायकलचा समावेश आहे. crime news
Bhishi police take drastic action:
मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक २६ ऑगस्ट २०२५ रोजी भिसी पोलीस स्टेशन हद्दीत गस्तीवर असलेल्या पथकाला गोपनीय माहिती मिळाली की, मौजा लोहारा येथील प्रज्वल धारणे हा युवक अवैधरित्या दारूची वाहतूक करणार आहे. त्यानंतर पंचांच्या उपस्थितीत बोडदा नदी परिसरात सापळा रचण्यात आला. आरोपी मोटारसायकलवरून येत असताना त्याला अडवून झडती घेण्यात आली असता, त्याच्या ताब्यातून कोकण कंपनीच्या १८० एमएलच्या १९२ निपा देशी दारू असा एकूण १९,२०० रुपयांचा अवैध साठा आढळून आला. तसेच दारू वाहतुकीसाठी वापरलेली मोटारसायकल किंमत ७०,००० रुपये मिळून एकूण ८९,२०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

या प्रकरणी आरोपीविरुद्ध भिसी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

सदरची कारवाई पोलीस अधीक्षक श्री. मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक श्री. ईश्वर कातकडे, उपविभागीय पोलीस अधिकारी ब्रम्हपुरी श्री. दिनकर ठोसरे यांच्या मार्गदर्शनाखाली, भिसी ठाणेदार सपोनि श्री. मंगेश भोंगाडे यांच्या नेतृत्वात पोउपनि श्री. रविंद्र वाघ, पोउपनि श्री. भारत थिटे, पोहवा अजय बगडे, बाळकृष्ण जिभकाटे व पोअं श्रीकांत वाढवी यांनी केली.

👉 भिसी पोलीसांच्या या कारवाईमुळे अवैध दारू विक्रेत्यांना चांगलाच चपराक बसला आहे.


Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment