Ads

अम्मा चौक स्मारकाची पुरातत्त्व विभागाकडे तक्रार

चंद्रपूर :-शहर पोलीस स्टेशन व सात मजली इमारतीच्या मधोमध असलेल्या जागेवर चंद्रपूर महानगरपालिकेने कोणतीही पूर्वपरवानगी न घेता अम्मा चौक स्मारकाचे बांधकाम सुरू होते. या पार्श्वभूमीवर चंद्रपूर शहर काँग्रेसचे अध्यक्ष रितेश (रामू) तिवारी यांनी पुरातत्त्व विभागाकडे लेखी निवेदन सादर करीत परवानगी देणाऱ्या महानगरपालिकेची चौकशी करून कारवाई करण्याची मागणी केली आहे.
Complaint to the Archaeological Department regarding Amma Chowk Monument
गांधी चौक परिसराची ऐतिहासिक पार्श्वभूमी लक्षात घेता, येथे भारतीय पुरातत्त्व विभागाच्या सूचनेनुसार कोणतेही काम करता येत नाही, असे असताना देखील केवळ आमदार किशोर जोरगेवार यांच्या मातोश्रींच्या नावे स्मारक उभारण्याचा प्रकार सुरू होता. हे काम १९५८ च्या भारतीय पुरातत्त्व अधिनियमाचे उल्लंघन असून, तातडीने हे बांधकाम थांबवावे व चौकशी करून दोषींवर कारवाई करावी. तसेच, याठिकाणी भारतीय पुरातत्त्व विभागाची अधिसूचना लावण्यात यावी, अशी मागणी रितेश तिवारी यांनी केली आहे.


चंद्रपूरमधील अनेक स्वातंत्र्यसैनिक, समाजसेवक, माजी लोकप्रतिनिधींनी मोठे योगदान दिले आहे, मात्र त्यांना कधीही स्मारक वा गौरव मिळाला नाही. मात्र टोपल्या विकणाऱ्या एका महिलेसाठी स्मारक उभारण्याचा निर्णय हा पक्षपाती आणि चुकीचा असल्याची टीकाही त्यांनी केली आहे.

या संपूर्ण प्रकरणावर महानगरपालिकेने तातडीने खुलासा करावा व या बांधकामाची परवानगी देणाऱ्या महानगरपालिकेवर पुरातत्त्व विभागा कडून कारवाई करावी, अन्यथा काँग्रेस पक्षाकडून जनआंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही तिवारी यांनी दिला आहे.


Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment