चंद्रपुर :- मोरवा (वि.)गावातील पाच वर्ष्याचा चिमुकला प्रितम अनिल उमाटे ब्लडकॅन्सर ह्या असाध्य रोगाशी झुंज देत आहे. त्याचे वडील कोरोना काळात मरण पावले असून घरची परिस्थिती बेताची आहे त्याला दरमहा केमोथेरपी साठी नागपूरला जावे लागते प्रत्येकवेळी येणाऱ्या खर्चाची जमवा जमव श्यक्य नसल्याने त्याला उपचारासाठी आर्थिक मदत व्हावी म्हणून जि. प. मोरवा शाळेतील विध्यार्थांनी आपल्या खाऊच्या पैशातून मदत करण्याचा प्रयत्न केला हे वृत्त समजताच साहित्यिक कवी अशोक वर्मा, उपविभागीय अभियंता एल. व्ही. घागी, प्रभाकर मस्के, विश्वदीप गोंडाने, अर्जुन चव्हाण यासारख्या दानवीरांनी सामाजिक कार्यकर्ता डॉ. मनोज तेलंग यांच्याशी संपर्क साधून मदतीसाठी हाथ पुढे केला.
गावातील सरपंच स्नेहा साव, उप सरपंच भूषण पिदूरकर शाळा व्यवस्थापन समिती, मुख्याध्यापक, प्रतिष्टीत नागरिकांच्या उपस्थितीत प्रितमला आर्थिक मदत करण्यात आली. शिषवृती परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या श्रुती थेरे, आयुश वैरागडे, अदिती पिंपळकर, वैदेही सालोडकर ह्या गुणवंत विध्यार्थ्यांचा सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. परिसरातील प्रयोगशील शेतकरी रामभाऊ बुचे येरूर ह्यांना कृषिरत्न डॉ. पंजाबराव देशमुख प्रेरणा पुरस्कार प्रदान करण्यात आला. शालेय साहित्यासाठी विध्यार्थ्यांचा मदतीला हाथभार लावणारे गौरव पाटील यांना यावेळी सन्मानित करण्यात आले. जेष्ठ कवी अशोक वर्मा ह्यांना डॉ. पंजाबराव देशमुख जिवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
प्रितमला कायम मदतीचा हाथ देण्यासाठी तपोवन लेव्हिस्टिक प्रा. लि. चंद्रपूर च्या वतीने कंपनीच्या सामाजिक दाईत्व फंडातून 30 टक्के रक्कम प्रितम सारख्या गरजूना देण्यात येईल असे प्रतिपादन यावेळी डॉ. मनोज तेलंग यांनी केले. विदयार्थ्यांनी प्रितमला मदत देण्यासाठी केलेल्या प्रयत्नाची दखल म्हणून त्यांना पैगाम सामाजिक संस्थेच्या वतीने राहील पटेल, अशोक धात्रक, गौरव पाटील यांनी स्कूल बॅग, नोटबुक दिले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अर्जुन चव्हाण स. शीक्षक यांनी, प्रास्ताविक त्रिग्य गोंडाने, आभार अक्षय काटकर यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सचिन साव, रजनी पिदूरकर, शुभांगी थेरे, प्रिती मुसळे, संतोष गेडेकर यांनी परिश्रम घेतले कार्यक्रमाला शाळेतील विद्यार्थी, पालकांची उपस्थिती होती.
0 comments:
Post a Comment