चंद्रपूर | स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूरने अट्टल चोरट्याच्या मुसक्या आवळत आठ चोरींचा पर्दाफाश केला असून तब्बल ₹5,30,000/- किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
“A stubborn thief caught! 8 thefts exposed – valuables worth ₹5.3 lakh seized”
२४ नोव्हेंबर २०२५ रोजी शहरात पेट्रोलिंगदरम्यान मिळालेल्या खात्रीशीर माहितीनुसार आरोपी प्रतिक उर्फ राहुल वनराज झाडे (वय ३५), रा. महाकाली कॉलरी, चंद्रपूर याला ताब्यात घेण्यात आले. कौशल्यपूर्ण तपासात त्याच्याकडून रामनगर, चंद्रपूर शहर तसेच नागपूर (इमामवाडा) हद्दीतील एकूण ४ मोटारसायकली आणि ४ देवस्थान/मंदिर/चर्च/बौद्ध विहार येथे झालेल्या चोरींचा उलगडा झाला.
आरोपीने खालील ठिकाणांहून नगदी चोरीची कबुली दिली—
1. हनुमान मंदिर, दादमहल वार्ड
2. लक्ष्मी नारायण मंदिर, मेन रोड
३) संत अंद्रिया चर्च, जयंत टॉकीज जवळ
४) दिशाभूमी बौद्ध विहार, डॉ. आंबेडकर कॉलेज परिसर
आरोपीकडून जप्त मुद्देमाल—
Honda Activa (₹50,000)
Honda Shine (₹70,000)
Bullet Royal Enfield (₹3,00,000)
Yamaha R15 (₹50,000)
Realme 11X 5G Mobile (₹20,000)
OPPO A17 Mobile (₹20,000)
POCO C61 Mobile (₹20,000)
एकूण जप्त रक्कम : ₹5,30,000/-
ही कारवाई पोलीस अधीक्षक श्री. मुम्मका सुदर्शन व अपर पोलीस अधीक्षक श्री. ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांच्या नेतृत्वात पोउपनि विनोद भुरले, सुनिल गौरकार, पोहवा सुभाष गोहोकार, सतिश अवथरे, रजनिकांत पुठ्ठावार, दिपक डोंगरे, इमरान खान, पोअं हिरालाल गुप्ता, किशोर वाकाटे, शशांक बादामवार यांनी संयुक्तरीत्या पार पाडली.
0 comments:
Post a Comment