चंद्रपूर, दि. 24 नोव्हेंबर — चंद्रपूर शहरातील वाढत्या मोटारसायकल चोरीच्या घटनांवर अंकुश ठेवण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मोठी कारवाई करून एका अट्टल चोरट्याला अटक केली. आरोपीकडून 8 पो-या उघडकीस आणत एकूण ₹4,80,000/- किमतीच्या विविध मोटारसायकली व मोबाईल फोनचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
Chandrapur Local Crime Branch action — 8 thieves exposed
मा. पोलीस अधीक्षक श्री. मुम्मका सुदर्शन साहेब व मा. अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली, तसेच पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांच्या नेतृत्वाखाली उपविभाग चंद्रपूर पथक शहरात पेट्रोलिंग करीत असताना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार आरोपी प्रतिक उर्फ राहुल धनराज झाडे (वय 35, रा. महाकाली कॉलरी, चंद्रपूर) यास ताब्यात घेण्यात आले. चौकशीदरम्यान आरोपीने चंद्रपूर शहरातील विविध धार्मिक स्थळे व परिसरात चोरी केल्याची कबुली दिली.
तपासात आरोपी हा मागील पाच वर्षांपासून मोटारसायकल चोरी, घरफोडी व इतर गुन्ह्यांत फरार असल्याचे निष्पन्न झाले असून पुढील तपास स्थानिक गुन्हे शाखा करीत आहे.
जप्त मुद्देमाल :
होंडा अॅक्टिवा (पांढरा) – ₹50,000/-
हिरो शाईन सीबी मोटारसायकल – ₹70,000/-
रॉयल एनफिल्ड थंडरबर्ड 500 – ₹3,00,000/-
यामाहा R–15 मोटारसायकल – (किंमत नोंद उपलब्ध)
रियलमी 11x 5G मोबाईल – ₹20,000/-
ओपो A17K मोबाईल – ₹20,000/-
पोको C61 मोबाईल – ₹20,000/-
एकूण मुद्देमाल : ₹4,80,000/-
---
कारवाईत सहभागी अधिकारी:
पोउपनि विनोद भुरले, पोउपनि सुनील गौरकार, पोहवा सुभाष गोहोकार, पोहवा सतिश अवयरे, पोहया रजनिकांत पुठ्ठावार, पोहवा दीपक डोंगरे, पोहवा इमान खान, पोशि हिरालाल गुप्ता, पोअ किशोर वाकाटे, पो शशांक बदामवार — स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूर.
0 comments:
Post a Comment