चंद्रपूर : सीएचएल मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर येथे मा. आमदार किशोर जोरगेवार यांच्यावर हृदयविकारासंदर्भात तातडीची उपचारप्रक्रिया यशस्वीरीत्या पार पडली आहे.
Chandrapur MLA Kishore Jorgewar undergoes successful angioplasty; condition stableरुग्णालय प्रशासनाने प्रसिद्ध केलेल्या बुलेटिननुसार, त्यांना अनस्टेबल अँजायना (हृदयविकाराचा त्रास) झाल्याने दाखल करण्यात आले होते.
त्यानंतर करण्यात आलेल्या कोरोनरी अँजिओग्राफीमध्ये त्यांच्या डाव्या अँटेरियर डिसेंडिंग (LAD) कोरोनरी आर्टरीमध्ये तब्बल ८५ टक्के अरुंदता (ब्लॉकेज) आढळून आली. परिस्थितीची गांभीर्य लक्षात घेऊन तात्काळ अँजिओप्लास्टी करण्यात आली व LAD मध्ये एक स्टेंट बसविण्यात आला.
ही संपूर्ण प्रक्रिया कोणत्याही अडचणीशिवाय यशस्वीरीत्या पूर्ण झाली असून आमदार जोरगेवार यांची प्रकृती सध्या स्थिर आहे आणि ते उपचारांना चांगला प्रतिसाद देत आहेत, अशी माहिती उपचार करणारे हृदयरोगतज्ज्ञ डॉ. रोहन ऐंचवार यांनी दिली.
दरम्यान, त्यांच्या प्रकृतीची माहिती समजताच समर्थक व नागरिकांनी रुग्णालयाबाहेर गर्दी केली असून सर्वत्र त्यांच्या लवकरात लवकर पूर्ण बरे होण्यासाठी शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
0 comments:
Post a Comment