राजुरा ३१ मार्च :-
स्टेला मॅरिस कॉन्व्हेन्ट स्कूल बामनवाडा येथील सीबीएसई इयत्ता पाचवीत शिकणाऱ्या अनुज रत्नाकर गादंगीवार या विद्यार्थ्याची जवाहर नवोदय विद्यालय इयत्ता सहावी प्रवेश परीक्षेत निवड झाली असून त्याचा ३९ वा क्रमांक आहे.
राजुरा तालुक्यातील भेदोडा या ग्रामीण भागातील रहिवासी असलेल्या अनुजचे वडील रत्नाकर गादंगीवार हे सध्या कृषी विभागात उप कृषी अधिकारी म्हणून कार्यरत असून आई स्नेहा गादंगीवार बीएससी पदवीधर आहे. त्याने आपल्या यशाचे श्रेय शिक्षक, आई वडील, नातेवाहिक आणि मित्र परिवाराला दिले आहे. अनुज च्या यशाबद्दल शाळेच्या मुख्याध्यापिका, शिक्षकांनी अभिनंदन केले व पुढील यशस्वी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. अनुज ग्रामीण भागात असूनही जवाहर नवोदय विद्यालय येथील प्रवेश परीक्षेत चांगले यश संपादन केले आहे. जिद्द, चिकाटी व अभ्यासातील सातत्य यामुळे त्यांनी हे यश मिळवले आहे.
0 comments:
Post a Comment