Ads

💥 धडाकेबाज कारवाई : चंद्रपुरात एम.डी. ड्रग्जसह आरोपी जेरबंद!

चंद्रपूर : शहरातील जलनगर वार्ड परिसरात स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत एम.डी. (मेफेड्रोन) ड्रग्ज विक्रीसाठी येणाऱ्या आरोपीला रंगेहात अटक केली. या कारवाईत तब्बल ५५.०९ ग्रॅम ड्रग्ज पावडरसह एकूण ३ लाख ५५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
Daring Operation: Accused Apprehended in Chandrapur with MD Drugs
मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, माधव नारायण मामीड (वय ३६, रा. जलनगर वार्ड, चंद्रपूर) हा रामाळा तलाव रोड परिसरात ड्रग्ज विक्रीसाठी येणार असल्याची खात्रीशीर माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी मनपा ओपन गार्डन परिसरात सापळा रचला.
दरम्यान आरोपी घटनास्थळी येताच पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. झडतीदरम्यान त्याच्याकडून ५५.०९ ग्रॅम मेफेड्रोन (एम.डी.) पावडर आणि सिल्वर रंगाची ज्युपिटर मोपेड (क्र. MH 34 BN 4861) जप्त करण्यात आली.
या प्रकरणी आरोपीविरुद्ध एनडीपीएस कायदा १९८५ अन्वये चंद्रपूर शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे.

 ही कारवाई पोलीस अधीक्षक श्री. मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांच्या नेतृत्वात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली.
 चंद्रपुरात ड्रग्जविरोधी मोहिमेला वेग — गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई!
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment