Ads

वाघाचा रस्ता अडवून ‘सेल्फी स्टंट’ महागात; व्हायरल व्हिडिओनंतर वनगुन्हा दाखल'

चंद्रपुर :-मोहर्ली-पद्मापूर रस्त्यावर वाघाचा पाठलाग करून व्हिडिओ काढणाऱ्या काही पर्यटकांवर वनविभागाने कडक कारवाई करत वनगुन्हा दाखल केला आहे. समाजमाध्यमांवर हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर वनविभागाने तातडीने चौकशी सुरू केली आहे.
'Selfie Stunt' Blocking a Tiger's Path Proves Costly; Forest Offense Case Filed Following Viral Video

दिनांक १५ मार्च २०२६ रोजी मोहर्ली-पद्मापूर मार्गावर काही लोकांनी आपली वाहने रस्त्यावर थांबवून वाघाचा व्हिडिओ काढण्यासाठी गर्दी केली. इतकेच नव्हे तर काही जण रस्त्याच्या खाली उतरून वाघाचा पाठलाग करत त्याचा व्हिडिओ काढत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसून आले. या प्रकारामुळे वाघाच्या नैसर्गिक हालचालींमध्ये अडथळा निर्माण झाला असून वन्यजीवांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.
या प्रकरणाची गंभीर दखल घेत वनविभागाने रस्त्यावर वाहने थांबविणाऱ्या वाहनांवर जप्तीची कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. तसेच रस्त्याच्या खाली उतरून वाघाचा पाठलाग करणाऱ्या व्यक्तींविरुद्ध वनगुन्हा क्रमांक 09654/211333 (दि. १५/०३/२०२६) नोंदविण्यात आला असून भारतीय वन अधिनियम १९७२ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबंधित आरोपींची ओळख पटवून त्यांच्यावर न्यायालयीन कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती वनविभागाने दिली आहे.

या प्रकरणाची चौकशी मोहर्लीचे वनपरिक्षेत्र अधिकारी संतोष थिपे करीत आहेत. व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या व्यक्तींची ओळख पटल्यास नागरिकांनी ९८३४६८९५४१ या क्रमांकावर माहिती देण्याचे आवाहन वनविभागाने केले आहे.
वनविभागाने नागरिकांना आणि पर्यटकांना आवाहन करताना सांगितले की, अशा प्रकारच्या घटनांमुळे वन्यजीवांच्या हालचालींना अडथळा निर्माण होतो आणि त्यांच्या सुरक्षिततेला धोका निर्माण होतो. त्यामुळे वाघासह इतर वन्यजीवांच्या भ्रमणमार्गात अडथळा निर्माण होईल असे कृत्य टाळावे.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment