Ads

“शासकीय जागेवर बेकायदेशीर बांधकाम! गोदाम फोडून साहित्य वापरल्याचा गंभीर आरोप”

राजुरा : सार्वजनिक बांधकाम विभागाच्या (PWD) जागेवर अनधिकृत बांधकाम करून तसेच शासकीय गोदामाचे कुलूप तोडून साहित्याचा विनापरवाना वापर केल्याच्या गंभीर प्रकरणात विरूर स्टेशन ग्रामपंचायतीला उपविभागीय अभियंता, सार्वजनिक बांधकाम उपविभाग राजुरा यांनी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित ग्रामपंचायतीने कोणतीही वैध परवानगी न घेता PWD च्या मालकीच्या जागेवर बांधकाम केले आहे. याशिवाय, विभागाच्या गोदामाचे कुलूप तोडून तेथील बांधकाम साहित्य परवानगीशिवाय वापरण्यात आल्याचे तपासात उघड झाले आहे.
ही बाब अत्यंत गंभीर मानली जात असून, शासकीय मालमत्तेचे नुकसान आणि नियमांचे उल्लंघन झाल्याचे स्पष्ट झाले आहे. याप्रकरणी ग्रामपंचायतीने ७ दिवसांच्या आत सविस्तर लेखी खुलासा सादर करावा, असे निर्देश देण्यात आले आहेत.
निर्धारित मुदतीत समाधानकारक उत्तर न मिळाल्यास, कोणतीही पूर्वसूचना न देता अनधिकृत बांधकाम हटविणे, शासकीय साहित्याची वसुली आणि फौजदारी कारवाई करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.
ही नोटीस अंतिम संधी असल्याचेही स्पष्ट करण्यात आले असून, प्रशासनाने या प्रकरणात कडक भूमिका घेतल्याचे दिसून येत आहे.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment