सिंदेवाही -- शहरात मागील तीन दिवसांपासून पेट्रोलचा गंभीर तुटवडा निर्माण झाला असून सर्व पेट्रोल पंपांवर पेट्रोल उपलब्ध नसल्यामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. अत्यावश्यक कामांसाठीही वाहनांचा वापर करणे अशक्य झाले असून शेतकरी, कामगार, विद्यार्थी व व्यापारी वर्ग विशेषतः त्रस्त झाला आहे.
Petrol Shortage Grips Sindewahi for Three Days – Citizens Distressed, Administration Neglects the Issue!
– Grahak Panchayat Maharashtra, Sindewahi
या गंभीर समस्येकडे संबंधित प्रशासन व पेट्रोल पुरवठा यंत्रणेचे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे. वेळेवर पेट्रोलचा पुरवठा न होणे ही अत्यंत चिंतेची बाब आहे. यामुळे संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.तसेच, पेट्रोल टंचाईचे नेमके कारण काय आहे याबाबत प्रशासनाने स्पष्ट माहिती नागरिकांना द्यावी, अशीही मागणी करण्यात येत आहे.
ग्राहक पंचायत महाराष्ट्र सिंदेवाही वतीने आम्ही या परिस्थितीचा तीव्र निषेध करीत असून संबंधित अधिकाऱ्यांनी तात्काळ लक्ष देऊन पेट्रोल पुरवठा सुरळीत करावा.
या निष्काळजीपणामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप उसळला असून प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. इतक्या मोठ्या समस्येकडे संबंधित यंत्रणेचे झालेले दुर्लक्ष अत्यंत धक्कादायक आहे.
शहरातील पेट्रोल टंचाईचे नेमके कारण काय? पुरवठा का खंडित झाला? आणि तो कधी सुरळीत होणार? याबाबत प्रशासन पूर्णतः मौन बाळगून असल्याने नागरिकांमध्ये संभ्रम व रोष अधिकच वाढत आहे.
नागरिकांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नये, अशी स्थिती निर्माण झाली असून तात्काळ पेट्रोल पुरवठा सुरळीत करावा,
0 comments:
Post a Comment