मूल :
शहरातील वॉर्ड क्रमांक १५ मध्ये धाडसी घरफोडीची घटना घडून लाखो रुपयांचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सेवानिवृत्त कर्मचारी प्रकाश चिप्पावार हे आपल्या कुटुंबासह नागपूर येथे एका समाज मेळाव्यासाठी गेले होते. दोन दिवस घर बंद असल्याचा फायदा घेत चोरट्यांनी घरावर डल्ला मारला.Audacious Burglary in Mul; Jewelry Worth Lakhs Stolen
दरम्यान, शेजाऱ्यांनी घराचे दार उघडे असल्याचे लक्षात येताच त्यांनी चिप्पावार यांना फोनवरून माहिती दिली. त्यांनी तत्काळ मूल येथे येऊन पाहणी केली असता घरफोडी झाल्याचे उघडकीस आले.
घरातील आलमारी उघडून सामान अस्ताव्यस्त फेकण्यात आले होते. दोन्ही लोखंडी आलमारीतील सोन्याचे दागिने चोरट्यांनी लंपास केले. यात सोन्याची पोत, बांगड्या, दीड तोळ्याची गोफ, अंगठी, गळसोरी, बारीक मणी असा सुमारे लाखो रुपयांचा ऐवज तसेच १० हजार रुपयांची रोख रक्कम चोरीला गेली आहे.
या घटनेची तक्रार मूल पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली असून पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.
दरम्यान, यापूर्वीही शहरातील गजानन महाराज मंदिरातून दानपेटी चोरीची घटना घडली होती. वाढत्या चोरीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे.
👉 नागरिकांनी घ्यावयाची काळजी:
घर बंद ठेवताना शेजाऱ्यांना माहिती द्यावी
सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत
मौल्यवान वस्तू सुरक्षित ठिकाणी ठेवाव्यात
0 comments:
Post a Comment