चंद्रपूर (प्रतिनिधी) | दि. २६ मे २०२६
स्थानिक गुन्हे शाखा (LCB) चंद्रपूर आणि पोलीस स्टेशन गोंडपिपरी यांच्या संयुक्त पथकाने प्रभावी कारवाई करत जबरी चोरीचा गंभीर गुन्हा अल्पावधीत उघडकीस आणला असून सराईत आरोपीला अटक करण्यात यश मिळवले आहे. या कारवाईत एकूण ₹९०,०००/- किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.Crime of forced theft exposed in Gondpiprit; Joint raid by LCB-Police, accused arrested in Sarai – valuables worth Rs 90 thousand seized
पोलीस स्टेशन गोंडपिपरी येथे गु.र.नं. २३६/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३०९ (४), ७६, १२६ (२) अंतर्गत जबरी चोरीचा गुन्हा नोंद करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास स्थानिक गुन्हे शाखा व गोंडपिपरी पोलीस यांच्याकडून समांतर पद्धतीने सुरू होता.
तपासादरम्यान मिळालेल्या खात्रीशीर गोपनीय माहितीनुसार, सचिन उर्फ बादशहा संतोष नगराळे (रा. राजुरा, जि. चंद्रपूर) हा सराईत गुन्हेगार या प्रकरणात सहभागी असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी सापळा रचून आरोपीला ताब्यात घेतले.
तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे कसून चौकशी केली असता, आरोपीने गोंडपिपरी तालुक्यातील वढोली गावाजवळ जबरी चोरी केल्याची कबुली दिली. त्याच्या निवेदनावरून गुन्ह्यातील मुद्देमाल आणि वापरलेले वाहन पंचांसमक्ष जप्त करण्यात आले.
जप्त मुद्देमाल:
▪️ दोन मोबाईल फोन – ₹३०,०००/-
▪️ अॅक्टिव्हा मोपेड दुचाकी – ₹६०,०००/-👉 एकूण – ₹९०,०००/-
आरोपीला पुढील कारवाईसाठी पोलीस स्टेशन गोंडपिपरी यांच्या ताब्यात देण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक आयुष नोपानी, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सत्यजीत आमले यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांच्या नेतृत्वाखाली सहायक पोलीस निरीक्षक रमेश हत्तीगोटे, तसेच संतोष निंभोरकर, विनोद भुरले, मंगेष कराडे, धनराज करकाडे, सुरेंद्र महतो, रजनीकांत पुट्टावार, चेतन गज्जलवार, विलास कोवे, प्रफुल्ल गारघाटे, सुमित बरडे, सुशील गोंग, आकाश गुंजकर आदी अधिकारी व अंमलदारांनी ही कारवाई यशस्वीरित्या पूर्ण केली
0 comments:
Post a Comment