Ads

भद्रावती तालुक्यात रात्रभर रेती तस्करी जोमात; बंद चारगाव, जेना घाट व मांगली नाल्यातून उपसा, महसूल, पोलीस व वनविभागाचे दुर्लक्ष....

भद्रावती तालुक्यात रात्रभर रेती तस्करी जोमात; बंद चारगाव, जेना घाट व मांगली नाल्यातून उपसा,  महसूल, पोलीस व वनविभागाचे दुर्लक्ष....

भद्रावती, जावेद शेख :- भद्रावती तालुक्यात अवैध रेती तस्करीने गंभीर स्वरूप धारण केले असून, रात्रभर मोठ्या प्रमाणावर रेती उपसा आणि वाहतूक सुरू असल्याचे स्पष्टपणे समोर आले आहे. विशेष म्हणजे शासनाने बंद केलेल्या चारगाव घाट, जेना घाट तसेच पारोधीघाट लगत ,मांगली नाला परिसरातूनही सर्रास रेती उपसा सुरू आहे.
      स्थानिक सूत्रांच्या माहितीनुसार, तस्कर रात्रीच्या वेळी ट्रॅक्टर, हायवा व इतर वाहनांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर रेतीची वाहतूक करत आहेत. अनेक ठिकाणी मुख्य मार्गांवरूनही ही अवैध वाहतूक उघडपणे सुरू असल्याचे दिसून येते.
     दरम्यान शासनाने बंद घोषित केलेल्या घाटातूनच अवैध रेती उपसा सुरू असणे ही अत्यंत गंभीर बाब मानली जात आहे. चारगाव येथून पहाटेच्या वेळी विजासन रोडच्या मुख्य मार्गाने रेतीची तस्करी होत असल्याचे स्थानिक नागरिकांनी व्यक्त केले व जेना घाट हे तस्करांचे मुख्य केंद्र बनले असून, कोणत्याही प्रकारची भीती न बाळगता तस्करी सुरू आहे.
       या प्रकाराकडे महसूल विभाग, पोलीस प्रशासन तसेच वनविभाग यांचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे. रात्रभर सुरू असलेल्या या हालचालींकडे संबंधित यंत्रणांचे लक्ष नसल्याने प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
      प्रसंगी अवैध रेती तस्करीमुळे शासनाचा मोठ्या प्रमाणावर महसूल बुडत असून, तस्कर मात्र मोठ्या प्रमाणात आर्थिक लाभ घेत आहेत. यासोबतच नदीपात्रातील अति उपसामुळे पर्यावरणीय ऱ्हास वाढत आहे.
       या प्रकारामुळे स्थानिक नागरिकांमध्ये संतापाची भावना वाढली असून, बंद घाटांवर तात्काळ नियंत्रण, रात्रीची कडक गस्त व तपासणी, तस्करांवर कठोर फौजदारी कारवाई, स्थायी निगराणी पथक  यांची मागणी होत आहेत.
     याशिवायही तालुक्यातील वाढती रेती तस्करी रोखण्यासाठी जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक व वनविभाग यांनी संयुक्त पथक तयार करून तातडीने कारवाई करावी, अशी मागणी जोर धरत आहे.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment