चंद्रपूर | प्रतिनिधी
शहरात सुरू असलेल्या अमृत 2 जल योजनेच्या निकृष्ट व नियमबाह्य कामांविरोधात महाविकास युवक आघाडी आक्रमक झाली असून, सोमवारी (दि. 1 जून) ‘घागर फोडो मोर्चा’ काढत मनपा प्रशासनाविरोधात जोरदार आंदोलन करण्यात आले. गेल्या सहा महिन्यांपासून युवासेना व राष्ट्रवादी युवक काँग्रेसकडून कंत्राटदारामार्फत होत असलेल्या कामांच्या गुणवत्तेबाबत सातत्याने तक्रारी व निवेदने देण्यात आली होती.
Amrut scheme in shambles; Youth Front's 'Ghagar Phodo' march hits Municipal Corporation over Amrut works in Chandrapur उपमुख्यमंत्री, सचिव तसेच महाराष्ट्र जल प्राधिकरणालाही याबाबत कळविण्यात आले, मात्र कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने अखेर आंदोलनाचा मार्ग स्वीकारण्यात आला.
मनपा आयुक्त अकनुरी नरेश यांनी काही ठिकाणी स्पॉट पंचनामा केला असला तरी त्यानंतरही कामात कोणताही सुधार दिसून आला नाही. त्यामुळे कंत्राटदारांवर मनपाचा नियंत्रण नसल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. या पार्श्वभूमीवर शिवाजी चौकातून निघालेल्या मोर्चात महिलांनी मोठ्या संख्येने सहभाग घेत हातात घागर घेऊन पाण्याच्या प्रश्नावर मनपा प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.
मोर्चा चंद्रपूर महानगरपालिका कार्यालयावर पोहोचल्यानंतर युवासेना जिल्हाप्रमुख विक्रांत सहारे व राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष संजय ठाकूर यांनी मनपा उपायुक्तांना प्रतीकात्मक घागर भेट देत निषेध व्यक्त केला. यावेळी दोषी अधिकारी व कंत्राटदारांवर फौजदारी गुन्हा दाखल करावा, ‘लक्ष्मी कन्स्ट्रक्शन’ला काळ्या यादीत टाकावे, कामात हलगर्जी करणाऱ्या मनपा अभियंते व महाराष्ट्र जल प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करावी, तसेच अमृत जल योजनेचे काम तातडीने पूर्ण करून नागरिकांना स्वच्छ पाणी उपलब्ध करून द्यावे, अशा मागण्यांचे निवेदन मनपा उपायुक्तांना देण्यात आले.
या आंदोलनात राजेश नायडू (शिक्षक सेना जिल्हाप्रमुख), यशपाल उर्फ बंटी कमटम (उपजिल्हाप्रमुख, युवासेना), अमोल मेश्राम (कंत्राटी कामगार सेना जिल्हाध्यक्ष), विवान रामटेके (उपतालुका प्रमुख, युवासेना), प्रशांत गद्दाला (युवासेना शहर प्रमुख), सागर गभने (तालुका समन्वयक), महेश श्रीगिरीवार (युवासेना तालुका प्रमुख), बब्बू ईसा (अल्पसंख्यांक अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस), दिनेश मिश्रा (विधानसभा अध्यक्ष), प्रवीण आरपेल्ली (युवक उपाध्यक्ष), सूरज चव्हाण (विधानसभा अध्यक्ष), समीर खान (युवक उपाध्यक्ष) यांच्यासह हजारो महिला-पुरुष मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
0 comments:
Post a Comment