जावेद शेख भद्रावती प्रतिनिधी :-चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा तालुक्यातील पिपरी रेती घाट परिसरात सध्या मोठा वाद निर्माण झाला आहे. शासनाने रेती वाहतुकीवर कडक निर्बंध लागू केलेले असताना, प्रत्यक्षात काही ठिकाणी रात्रीच्या अंधारात रेती उपसा आणि वाहतूक सुरू असल्याची चर्चा स्थानिकांमध्ये रंगत आहे.
"Secret movements from Pipri Ghat while sand transportation is banned? Is the administration asleep or is there suspicion of collusion!"
माहितीनुसार, सर्व अधिकृत रेती गाड्या बंद असतानाही काही व्यक्ती पिपरी घाटातून रेती काढून गावात नेली जात असल्याचे सांगितले जात आहे. या प्रकारामुळे प्रशासनाच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून “नियम सर्वांसाठी समान आहेत का?” असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
दरम्यान, या प्रकरणात काही नावे चर्चेत असली तरी अधिकृत पातळीवर कोणतीही पुष्टी झालेली नाही. त्यामुळे संबंधित यंत्रणांनी तातडीने चौकशी करून सत्य समोर आणावे, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे.
स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, जर खरंच बंदी असताना रेती उपसा होत असेल, तर ही गंभीर बाब असून महसूल व पोलीस विभागाने संयुक्त कारवाई करणे आवश्यक आहे. अन्यथा अशा प्रकारांना आळा बसणार नाही, असेही मत व्यक्त केले जात आहे.
प्रशासनाने या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी आणि कायद्याचे पालन सर्वांसाठी समान असल्याचा विश्वास नागरिकांमध्ये निर्माण करावा.
0 comments:
Post a Comment