भद्रावती | प्रतिनिधी – जावेद शेख:
गेल्या अनेक दिवसांपासून भद्रावती तालुक्यात भीतीचे वातावरण निर्माण करणारा बिबट अखेर वन विभागाच्या जाळ्यात अडकला आहे. घोटनिंबाळा, लोणारा पारखी, चालबर्डी, कचराला, रामटेक सोसायटी तसेच देऊरुवाडा या परिसरात या बिबट्याने अक्षरशः धुमाकूळ घातला होता. पाळीव जनावरांवर वारंवार हल्ले करून त्यांना भक्ष्य बनवत असल्याने गावकऱ्यांमध्ये प्रचंड दहशत पसरली होती.“The end of terror! The leopard that caused havoc in Bhadravati is finally caught by the forest department”
या पार्श्वभूमीवर वन विभागाने तातडीने कारवाई करत घोट येथील रामटेके यांच्या शेतात पिंजरा लावला होता. अखेर पहाटे सुमारे ४ वाजण्याच्या सुमारास हा बिबट पिंजऱ्यात अडकला. संबंधित बिबट नर जातीचा असून अंदाजे ४ ते ५ वर्षांचा असल्याची माहिती मिळाली आहे.
बिबट पकडला गेल्यानंतर गावकऱ्यांनी मोठा दिलासा व्यक्त केला असून भीतीचे वातावरण मोठ्या प्रमाणात कमी झाले आहे. अनेक दिवसांपासून त्रस्त असलेल्या नागरिकांनी वन विभागाचे आभार मानले.
ही यशस्वी कारवाई विभागीय वन अधिकारी, चंद्रपूर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. सहाय्यक वनसंरक्षक श्री. तरसे यांच्या नेतृत्वात वनपरिक्षेत्र अधिकारी किरण धानकुटे, भद्रावती विकास शिंदे, क्षेत्र सहाय्यक देवगडे तसेच पवन मांढरे, टिंकू मांढरे, राजू कुडमेथे, शैलेश कुरसंगे, अनिल शेंद्रे, किशोर मडावी आणि कपिल झाडे यांनी मोलाचे सहकार्य केले.
0 comments:
Post a Comment