Ads

"मनसे नेत्या कल्पना पोतर्लावार आक्रमक; नवजात बालक विक्री प्रकरणात निष्पक्ष तपासासाठी पोलीस अधीक्षकांना निवेदन"

चंद्रपूर | ४ जुलै :
चंद्रपूरमध्ये गाजत असलेल्या कथित नवजात बालक विक्री प्रकरणाला आता राजकीय वळण लागले असून, या प्रकरणात भाजप महिला आघाडीच्या एका पदाधिकाऱ्याचा कथित सहभाग असल्याचा आरोप करत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने निष्पक्ष व सखोल चौकशीची मागणी केली आहे.
"MNS leader Kalpana Potarlawar aggressive; representation to Superintendent of Police for fair investigation in newborn baby sale case"
मनसेच्या बल्लारपूर तालुका अध्यक्षा कल्पना पोतर्लावार यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन सादर करून, कोणत्याही राजकीय दबावाला बळी न पडता पारदर्शक आणि तातडीने तपास करण्याची मागणी केली. या प्रकरणातील सर्व दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करावी, तसेच तपासात कोणत्याही अधिकारी, कर्मचारी किंवा प्रभावशाली व्यक्तीचा सहभाग अथवा निष्काळजीपणा आढळल्यास त्यांनाही कायद्याच्या कक्षेत आणावे, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली.
यावेळी मनसे वाहतूक सेना जिल्हाध्यक्ष महेश वासलवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर उपाध्यक्ष राहुल देवतळे, सामाजिक कार्यकर्त्या प्रगती भोसले, मनसे जनहित जिल्हाध्यक्ष रमेश काळबांधे, शहराध्यक्ष पियुष धुपे, शुभांगी देवतळे आदी उपस्थित होते.
मनसेने आपल्या निवेदनात नमूद केले आहे की, नवजात बालकांची विक्री हा मानवतेला काळिमा फासणारा आणि अत्यंत गंभीर स्वरूपाचा गुन्हा आहे. त्यामुळे या प्रकरणाचा तपास पूर्णपणे निष्पक्ष, पारदर्शक आणि वेगाने होणे गरजेचे आहे. भविष्यात अशा अमानुष घटनांची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी प्रभावी उपाययोजना करण्याचीही मागणी करण्यात आली आहे.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment