Ads

सिंदेवाहीत कोहळी समाजाचा भव्य लोकप्रतिनिधी मेळावा; चार जिल्ह्यांतून प्रचंड उपस्थिती

  सिंदेवाही - दि. २२ : कोहळी समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक व औद्योगिक विकासाच्या विविध प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी सिंदेवाही येथे कोहळी समाजाचा भव्य लोकप्रतिनिधी मेळावा उत्साहात पार पडला. गोंदिया, भंडारा, चंद्रपूर व गडचिरोली या चारही जिल्ह्यांतून प्रचंड संख्येने समाजबांधव उपस्थित राहिले.
A grand gathering of Kohli community representatives in Sindevahi; Huge attendance from four districts
मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार डॉ. हेमकृष्ण कापगते होते. यावेळी कोहळी समाज विकास मंडळाचे अध्यक्ष प्रकाश बाळबुद्धे, पद्मश्री परशुराम खुणे, दिवाकर निकुरे, गंगाधर परशुरकर, अमोल मुंगमोडे, चामेश्वर गहाने, नाना नाकाडे, सदानंद बोरकर, कांचन गहाने, ललित बालबुद्धे यांची प्रमुख उपस्थिती होती.
मेळाव्यात “प्रथम समाज, नंतर पक्षधोरण” या भूमिकेला प्राधान्य देत समाजाच्या हितासाठी सर्वांनी एकजुटीने काम करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. पक्षीय विचार वेगवेगळे असले तरी समाजहिताचा प्रश्न आला तर सर्वांनी एकत्र येऊन समाजाच्या मागण्यांसाठी संघर्ष करावा, असा सूर यावेळी उमटला.
समाजाची संघटनशक्ती अधिक मजबूत करणे, युवकांना शिक्षण व रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे, उद्योग व व्यवसायाला चालना देणे, कोहळी विवाह पद्धत तसेच समाजाच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी शासनस्तरावर सातत्याने पाठपुरावा करण्याबाबतही चर्चा झाली.
मेळाव्याला एवढा मोठा प्रतिसाद मिळाला की, सभागृहातील जागा अपुरी पडली. सभागृहाच्या तिन्ही बाजूंना समाजबांधवांना बसण्याची व्यवस्था करण्यात आली. चारही जिल्ह्यांतून आलेल्या महिला, युवक, ज्येष्ठ नागरिक आणि समाजबांधवांच्या उपस्थितीने मेळाव्याला अभूतपूर्व स्वरूप प्राप्त झाले.
यावेळी माजी आमदार हेमकृष्ण कापगते, पद्मश्री परशुराम खुणे, प्रकाश बालबुद्धे, अमोल मुंगमोडे, दिवाकर निकुरे, विनोद बोरकर, प्रा. डॉ. सौ.किरण कापगते, श्यामजी हटवादे, संजय घोनमोडे, कल्पना बोरकर यांनी विविध विषयांवर मार्गदर्शन केले. रमाकांत लोधे यांनी प्रास्ताविक केले, तर प्रा. सुभाष बोरकर व भूपेश भाकरे यांनी सूत्रसंचालन केले आणि दिवाकर डी. बोरकर यांनी आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली.
“एकजूट समाजाची, ताकद समाजाची” या भावनेतून पार पडलेल्या या मेळाव्याने कोहळी समाजाच्या संघटनशक्तीचे प्रभावी दर्शन घडविले. या मेळाव्याच्या यशस्वी आयोजनासाठी सिंदेवाही कोहळी पाटील संघर्ष मंच यांनी विशेष सहकार्य केले.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment