चंद्रपूर: चंद्रपूर शहरातील श्री टॉकीजजवळ, घुटकाळा दर्गा परिसर, दीक्षीत वॉर्ड तसेच विविध मंदिरे आणि शैक्षणिक संस्थांच्या लगत सुरू असलेल्या मद्यविक्री दुकानाची तातडीने चौकशी करून नियमांचे उल्लंघन आढळल्यास नियमानुसार कडक कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी जोरदार मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) युवासेनेच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. युवासेना शहर प्रमुख सय्यद फरदिन अमिर यांच्या नेतृत्वात हे निवेदन सादर करण्यात आले आहे.
Demand for action against liquor shops in the areas related to Shri Talkies, Ghutkala Dargah and educational institutions in Chandrapur; Yuva Sena's statement to the District Collector
निवेदनात नमूद केल्यानुसार, संबंधित परिसर हा अत्यंत रहदारीचा भाग असून या ठिकाणी विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिक तसेच सर्वसामान्य नागरिकांची मोठी ये-जा असते. या परिसरात बजाज पॉलिटेक्निक तसेच नूतन नर्सरी ते इयत्ता दहावीपर्यंतच्या शाळांमधील विद्यार्थ्यांचा नियमित राबता असतो. यामुळे नागरिकांची सुरक्षितता, सार्वजनिक शांतता आणि कायदा-सुव्यवस्थेच्या दृष्टीने प्रशासनाने योग्य ती दक्षता घेणे अत्यंत आवश्यक बनले आहे.
स्थानिक नागरिकांकडून मिळालेल्या माहितीचा हवाला देत निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे की, या परिसरात मद्यप्राशनानंतर वाद-विवाद, भांडणे, शिवीगाळ तसेच सार्वजनिक शांतता भंग होण्याच्या घटना घडत आहेत. यामुळे परिसरातील नागरिकांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत असून तेथील सार्वजनिक वातावरणावरही याचा अत्यंत विपरीत परिणाम होत आहे. त्यामुळे संबंधित मद्यविक्री दुकानाची परवानगी, परवान्याच्या अटी, विक्रीची निर्धारित वेळ, दुकानाचे स्थान तसेच शैक्षणिक संस्था, धार्मिक स्थळे आणि सार्वजनिक रस्त्यांबाबतच्या नियमांचे पालन केले जात आहे किंवा नाही, याची सक्षम प्राधिकरणाकडून प्रत्यक्ष तपासणी करून कडक पावले उचलावीत, अशी मागणी युवासेनेने केली आहे.यावेळी
शाहरुख शेख, आरिश शेख, सय्यद आकिब, रझा सिद्दीकी, सलमान शेख, फरहान शेख, जाहिद शेख, काशिफ शेख, शाहजान शेख, व अन्य युवासैनिक उपस्थित होते.
0 comments:
Post a Comment