गडचांदूर: अनाधिकृत वस्त्यांमधील विकासकामांवरून नगरपालिकेत वाद; नगराध्यक्षांच्या मौनावर नागरिकांचा सवाल

गडचांदूर (प्रतिनिधी):
          गडचांदूर नगरपरिषद क्षेत्रातील हफीज नगर, मेश्राम नगर, मडावी नगर, पारखी नगर, बाबर नगर आणि लक्ष्मी टॉकीज परिसरातील मूलभूत नागरी सुविधांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. मागील २५ ते ३० वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या या परिसरातील नागरिकांनी नगरपरिषद प्रशासनाला निवेदन देऊन विकासकामांची मागणी केली आहे.Gadchandur: Dispute in the municipality over development works in unauthorized settlements; Citizens question the Mayor's silence
 या वेळी भाजपा गडचांदूर शहर अध्यक्ष अरविंद डोहे, गटनेता सतीश बेतावार, सौ. शितल धोटे, सौ. कीर्ती वैरागडे, सौ. संगीता गाऊत्रे, किशोर मोरे,
शाकीर मोहम्मद, रमेश चुदरी बबलू रासेकर, गणेश आदे, किट्टू जैस्वाल, सचिन माली, जयंता भोंगले, विठ्ठल धाडे, विकी उरकुडे, मोहन राठोड,दिवाकर धनवलकर, सचिन चुरे, गणपत बुरटकर,विवेक भेडोलकर, आदींची उपस्थिती होती

​प्रमुख मुद्दे व प्रश्न:
​मुख्याधिकाऱ्यांची भूमिका:
२५ जून २०२६ च्या विशेष सभेतील इतिवृत्तानुसार, ₹१०० च्या स्टॅम्प पेपरवर खरेदी केलेल्या किंवा अनधिकृत जमिनीवर रस्ते, नाल्या, वीज व पाणी यांसारखी विकासकामे करता येणार नाहीत, असा निर्णय मुख्याधिकाऱ्यांनी घेतला आहे.मात्र मुख्याधिकाऱ्यांच्या या भूमिकेवर नगराध्यक्ष व सत्ताधारी गट पूर्णपणे शांत असल्याने स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे.
​पूर्वीच्या ₹७० लाखांच्या कामांचा दाखला:
नागरिकांच्या म्हणण्यानुसार, हफीज नगर, मडावी नगर या परिसरात यापूर्वी रस्ते व पाण्याच्या पाइपलाइनसाठी सुमारे ₹७० लाखांची विकासकामे झाली आहेत. विशेष म्हणजे, ही कामे सध्याच्या मुख्याधिकाऱ्यांनीच मंजूर करून त्यांचे कार्यादेश व बिले अदा केली होती. मग जर ती कामे नियमानुसार झाली होती, तर आता नवीन कामांनाच नकार का दिला जात आहे? असा सवाल निवेदनातून विचारण्यात आला आहे. व या निर्णयावर नगराधक्ष गप्प कां असा सवाल सुद्धा केला जात आहे 

​नागरिकांची मुख्य मागणी व आंदोलनाचा इशारा:
​समान नियम, समान विकास: पूर्वग्रह न ठेवता सर्व वस्त्यांमध्ये नियमांनुसार मूलभूत सुविधा पुरवण्यात याव्यात.नगरपरिषद प्रशासनाने पुढील ७ दिवसांच्या आत यावर समाधानकारक निर्णय घेऊन लेखी स्पष्टीकरण द्यावे.मुदतीत तोडगा काढून लेखी खुलासा न दिल्यास वा कोणताही तोडगा काढल्यास मा.जिल्हाधिकारी (चंद्रपूर) आणि विभागीय आयुक्त (नागपूर) यांच्याकडे दाद मागणार असून आवश्यकता पडल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा भाजपाचे शहर अध्यक्ष अरविंद डोहे व गटनेता सतीश बेतावार यांनी दिला असून नगर प्रशासन काय निर्णय घेतील याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment