नागपूरहून दारूची तस्करी; चंद्रपुरात एलसीबीचा सापळा!

चंद्रपूर : नागपूरहून चंद्रपूरमध्ये गणराज ट्रॅव्हल्समधून विदेशी दारूची अवैध वाहतूक करणाऱ्या दोन महिलांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने प्रियदर्शनी चौकात सापळा रचून ताब्यात घेतले. या कारवाईत ₹३६ हजार ७३० रुपये किमतीच्या विदेशी दारूच्या २३५ सीलबंद बाटल्या जप्त करण्यात आल्या. या प्रकरणात चंद्रपुरातील प्रिन्स केंजर याचा शोध सुरू आहे.Liquor smuggling from Nagpur; LCB trap in Chandrapur!

दिनांक १७ ऑक्टोबर २०२६ रोजी स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूरच्या उपविभागीय पथकाने प्रियदर्शनी चौक परिसरात सापळा रचला. नागपूरहून आलेल्या गणराज ट्रॅव्हल्स (क्रमांक MH 49 AT 1696) मधून विदेशी दारूची वाहतूक होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली.

पंचांसमक्ष घेतलेल्या झडतीदरम्यान महिलांच्या बॅगमध्ये बॉम्बे व्हिस्कीच्या ७५० मिली क्षमतेच्या ४० सीलबंद बाटल्या तसेच ऑफिसर चॉईस व्हिस्कीच्या ९० मिली क्षमतेच्या १९५ सीलबंद बाटल्या आढळून आल्या. जप्त करण्यात आलेल्या दारूची एकूण किंमत ₹३६,७३० असल्याचे सांगण्यात आले.

दोन महिला आरोपी ताब्यात

या प्रकरणात राजकुमारी धीरज जाट (वय ३६) आणि शिवरात्री संजय जाट (वय ५९), दोघीही रा. बेलगाव, केंजर मोहल्ला, जबलपूर, मध्य प्रदेश, यांना ताब्यात घेण्यात आले आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, या महिला नागपूरहून विदेशी दारू आणून चंद्रपूर येथील प्रिन्स केंजर याला विक्रीसाठी देणार होत्या. या प्रकरणातील प्रिन्स केंजर, रा. केंजर मोहल्ला, चंद्रपूर, याचा शोध घेतला जात आहे.

रामनगर पोलिसांत गुन्हा दाखल

या प्रकरणी पोलीस स्टेशन रामनगर येथे महाराष्ट्र दारूबंदी कायद्याच्या कलम ६५ (अ) व ८३ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अवैध विदेशी दारूच्या वाहतुकीविरोधात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केलेल्या या कारवाईमुळे दारू तस्करीच्या प्रकरणाकडे पुन्हा लक्ष वेधले गेले आहे.

कारवाई करणारे पथक : उपविभाग चंद्रपूर पथक, स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूर.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment