कॅनालच्या पाण्यात वाघाचा मृत्यू! वरोरा वनपरिक्षेत्रात खळबळ

वरोरा (जावेद शेख) : वरोरा वनपरिक्षेत्रांतर्गत टेमुर्गा उपक्षेत्रातील रामपूर नियतक्षेत्रात कॅनालमध्ये एका मृत वाघाचे शव आढळून आल्याने वनविभागात खळबळ उडाली आहे. सोमवार, १६ नोव्हेंबर रोजी दुपारी ३.१५ वाजताच्या सुमारास कत्तापूर-बारवा शिवारालगत असलेल्या कॅनालमध्ये हा मृत वाघ आढळला. वाघाच्या मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून, या घटनेमुळे वन्यजीवप्रेमींमध्येही चिंता व्यक्त केली जात आहे.

घटनेची माहिती मिळताच वरोरा वनपरिक्षेत्राचे वनपरिक्षेत्र अधिकारी सुनील मडावी, टेमुर्डी क्षेत्रसहाय्यक वितेश चव्हाण, रामपूरच्या वनरक्षक पुनमसिंग बम्हनात यांच्यासह वनकर्मचाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. परिस्थितीची पाहणी करून वरिष्ठ अधिकाऱ्यांना घटनेची माहिती देण्यात आली.

घटनेचे गांभीर्य लक्षात घेता चंद्रपूर वनविभागाचे सहाय्यक वनसंरक्षक विकास तत्से, NTCA प्रतिनिधी बंडू धोतरे, PCCF प्रतिनिधी मुकेश आंदकर तसेच वनविभागाचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. कुंदन पोडशेलवार आणि आनंदवन येथील पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. महेश बिबटे यांनी घटनास्थळी भेट देऊन मृत वाघाची पाहणी केली.

शवविच्छेदनातून उलगडणार मृत्यूचे गूढ!

घटनास्थळावरील प्राथमिक पाहणीनंतर मृत वाघाचे शव पुढील तपासणी व शवविच्छेदनासाठी चंद्रपूर येथील ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटर (TTC) येथे हलविण्यात आले आहे. मंगळवार, १७ नोव्हेंबर रोजी शवविच्छेदन करण्यात येणार असून, त्यानंतरच वाघाच्या मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे.

वाघाचा मृत्यू नैसर्गिक कारणाने झाला की अन्य काही कारणामुळे, याबाबत सध्या कोणताही निष्कर्ष काढण्यात आलेला नाही. वनविभागाकडून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

चंद्रपूर जिल्ह्यातील व्याघ्रसंपदेच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या या घटनेत शवविच्छेदन अहवालाकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.


Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment