खबरबात khabarbat.in
सारथी सामाजिक विकास संस्थेकडून व प्रवासी संघटनेच्या वतीने वडूज आगाराला निवेदन
वडुज(मायणी)-ता.खटाव जि.सातारा(सतीश डोंगरे )
वडूज-मुंबई-वडूज (अंभेरी मार्गे) या मार्गाची बदललेली सेवा पुर्ववत सुरु करावी यासाठी सारथी सामाजिक विकास संस्थेकडून व प्रवासी संघटनेच्या वतीने वडूज आगाराला निवेदन देण्यात आले.
गेली वर्षानुवर्षे नियमित चालू असणारी व सामान्य माणसांना आपलीशी केलेली साध्या ला परिवर्तन बसची सेवा रद्द करुन त्या जागेवर महागडी व न परवडणारी निम आराम (हिरकणी) सेवा प्रवाशांना विश्वासात न घेता लादली गेली. गेले ३-४ माहिने ही सेवा तोंड दाबून बुक्यांचा मार दिल्याप्रमाणे सहन करावी लागत आहे.
महागाईने सामान्य मानसाचे कंबरडे मोडलेले असताना अशाप्रकारचे सेवा बदलण्याचे निर्णय प्रशासनाकडून प्रवाशांवर लादले जात आहेत व यामुळे तिकीटामागे जास्तीचा १०० ते १५० रुपयांचा भृदंड प्रवाशांना सहन करावा लागत आहे. तसेच प्रवाशांच्या सोयीचा विचार न करता असे अनेक अवास्तव निर्णय घेऊन एस.टी. खासगीकरणावर भर दिला जात असल्याचा संशय अनेक प्रवाशांकडून व्यक्त होत आहे
तरीही महामंडळाच्या गलथान कारभारावर प्रवासी संघटना नाराज असून जुनी सेवा पूर्ववत न केल्यास आंदोलनाचे हत्यार उपसण्याचा इशारा सारथी सामाजिक विकास संस्थेच्या वतीने देण्यात आलेला आहे
तरी अशा आशयाचे निवेदन वडूज आगार व्यवस्थापनाला दिले असून त्याची प्रत
मा.श्री.परिवहन मंत्री दिवाकर रावते यांना भेटून देण्यात येणार आहे, तसेच परिवहन विभाग, मंत्रालय व उपव्यवस्थापक यांनाही ही प्रत पाठविलेली आहे.
0 comments:
Post a Comment