पवनी/ मनोज चिचघरे:
घरगुती वादामुळे पतीने आपल्याच पत्नीला चाकूने डोक्यावर व हातावर वार करून गंभीर जखमी केल्याची घटना मंगळवारी सकाळी 11 वाजताच्या दरम्यान पवनी येथील शुक्रवारी वार्ड येथे घडली.जयश्री सुनील रंगारी, ३७ वय असे जखमी पत्नीचे नाव आहे,आरोपीने पत्नीला चाकूने जीवे मारण्याचा प्रयत्न केला,पोलिसांनी आरोपी सुनील प्रकाश रंगारी वय ४०वर्षे याच्यावर गुन्हा दाखल केला आहे,
जखमीच्या आई विश्रांती हरिदास मेश्राम, रा.सावली जिल्हा चंद्रपूर यांचा तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला, जखमींला भंडारा जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
पोलिसांनी भादंवि कलम ४९८ऐ ३०७ अन्वये गुन्हा दाखल केला,पोलिस निरीक्षक चंद्रशेखर चकाटे यांच्या मार्गदर्शनात पुढील तपास सुरू करण्यात आहे.
About
The Chandrapur Times
यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।
0 comments:
Post a Comment