सिटीपीएस सामान्य प्रशासनातील उपमुख्य अभियंता ओसवाल यांची हकालपट्टी करा-कंत्राटदारांची मागणी !
आशिया खंडात सर्वात मोठे चंद्रपूर जिल्ह्यातील महत्वाचे वीज उत्पादन केंद्र म्हणून चंद्रपूर महाऔष्णिक विद्दुत केंद्र अर्थात सिटीपीएस सद्ध्या एका अभियंत्यांच्या मानसिक विक्रुत्तीमुळे गाजत आहे. या विद्दूत केंद्रात विदर्भ मराठवाडा आणि महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यातील कंत्राटदार ऑनलाईन निविदा भरून इथे विविध प्रकारची कामे करतात. पण त्या कंत्राटदारांना या विद्दूत केंद्रातील सामान्य प्रशासनात असलेले उपमुख्य अभियंता ओसवाल यांच्या अरेरावीमुळे व दफ्तर दिरंगाईमुळे मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. आम्हच्या प्रतिनिधीनी घेतलेल्या माहिती नुसार उपमुख्य अभियंता ओसवाल हे जेव्हापासून सामान्य प्रशासन विभागामधे आले तेव्हापासून कंत्राटदारांची बिल रोखणे. सर्व काही कागदपत्रे अपडेट असतांना जाणीवपूर्वक उशीर लावणे.त्यांच्या खाली काम करणाऱ्या अनेक अभियंता कर्मचाऱ्यांना विनाकारण खालच्या दर्जाची वागणूक देवून त्यांच्या फाईलच्या प्रश्नांची उत्तरे न देता उलट त्यांच्यावरच उद्धटपणाणे वागणे आणि रागावणे.कधी तब्बेतीचे कारण पुढे करून कैबिनमधेच झोप काढणे, कैबिनमधे मोबाईलवर गेम खेळणे. कधी कधी एकांतात असतांना कैबिनमधे स्वतःचं बडबडणे. या त्यांच्या विक्रूत वागण्याने त्यांची मानसिक स्थिती बरोबर नाही हे स्पष्ट होते त्यामुळे ते या सामान्य प्रशासनामधे काम करण्यास सक्षम नाही. त्यांच्या या वागण्याने त्यांच्या हाताखालील काम करणारे अधिकारी कर्मचारी यांच्या सुद्धा फार तक्रारी आहे, कारण त्यांच्याकडे कुठल्याही प्रश्नाचे उत्तर मिळत नाही त्यामुळे ते त्रस्त झाले असून वेळेवर बिल तयार होत नसल्याने कंत्राटदार सुद्धा मोठे संतापले आहे.त्यामुळे सीटीपीएस प्रशासनाच्या कामकाजात दिरंगाई होत असल्याने मोठे आर्थिक नुकसान कंत्राटदारांचे होत आहे. उपमुख्य अभियंता ओसवाल ज्या महत्वाच्या पदावर कार्यरत आहे तिथे चांगले काम करणारे. अनुशासन पाळणारे आणि ठरलेल्या वेळेवर सर्व कार्यालयीन कामे करून कर्मचारी आणि कंत्राटदार यांच्यात समन्वय साधणारे सक्षम अधिकारी असने आवश्यक आहे.त्यामुळे उपमुख्य अभियंता ओसवाल यांची त्या जागेवरून हकालपट्टी करावी अशी मागणी सर्व कंत्राटदार करीत आहे.
About The Chandrapur Times
0 comments:
Post a Comment