साप्ताहिक 'दिनचर्याचा' पाचवा वर्धापन अंकाचे जिल्हा माहिती अधिकारी यांच्या हस्ते प्रकाशन
साप्ताहिक दिनचर्याचा पाचवा वर्धापन दिनाचा अंक आपल्या हाती देताना अत्यंत आनंद होत आहे.
23 सप्टेंबर 2014 ला माता महाकालीच्या आशीर्वादाने 'दिनचर्या' साप्ताहिक सुरू केले. आणि पाहता पाहता आपल्या सर्वांच्या मनस्वी आशीर्वादाने न थांबता आपले वाचकां पर्यंत पोहोचता आले. आपणास सांगताना मनस्वी आनंद होतो की, आपण वाचक, जाहिरातदार, मित्रपरिवार, माझे सहकारी प्रतिनिधी, त्यांनी मनापासून प्रेम देऊन सहकार्य केले. वृत्तपत्र चालू करताना, मनात एक ध्येय ठेवून दिनचर्या ची सुरुवात केली. आपल्या स्नेहाने मोठे करण्याचे बळ मिळाले. असेच बळ पुन्हा पुन्हा मिळत राहो, आणि हे लावले रोपटे आपल्याआशीर्वादाने मोठे होत राहाव . तसेच आमच्या वाचकांसाठी दिवाळी अंक, व 'दिनचर्या दिनदर्शिका' दरवर्षी प्रकाशित करून ती वाचकासाठी उपलब्ध करून देण्याचे आमचे सदैव प्रयत्न राहील.यासाठी आपल्या सहकार्याचीही गरज आहे. जिल्ह्याच्या सर्व तालुक्यात वाचक, सदस्य निर्माण झाली तळागाळातील,गाव पातळीवर,सर्वसामान्य माणसांपर्यंत पोचवण्याचे आमचे ध्येय असून दीनदलित बलुतेदारांच्या हक्कासाठी, झटून त्यांना वाच्या फोडण्यासाठी 'दिनचर्या ' नेहमी तत्पर असेल.
यासाठी आपल्या सहकार्याची, स्नेहरुपी प्रेमाची गरज आहे. म्हणून मी आपल्या सर्वांच्या स्नेहपूर्वक आदर...! 23 सप्टेंबर हा दिनचर्या मराठी साप्ताहिक वृत्तपत्र खऱ्या अर्थाने आपली ओळख निर्माण करणाऱ्या वृत्तपत्राची पाच वर्षे पूर्ण होऊन सहाव्या वर्षात पदार्पण करीत आहे. या अंकाचे प्रकाशन माननीय जिल्हा माहिती अधिकारी प्रवीण टाके सर यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी दिनचर्या चे संपादक दिनेश एकवनकर, राजू बिठ्ठूरवार, प्रभाकर आवारी, नरेश निकुरे, सुरज गोरंतवार तसेच कार्यालयातील कर्मचारी यांची उपस्थिती होती.
0 comments:
Post a Comment