चिमुर
*शासकीय रूग्णालय हे गोर-गरिबांसाठी नवजीवन देणारे आरोग्यकेंद्र असते तर डाॅक्टर हा रुग्णांसाठी देव असतो. डाॅक्टरांचे स्नेहाचे बोल रुग्णांसाठी संजीवनी बुटी चे कार्य करते. चिमुर तालुक्यातील भिसी येथील ग्रामीण रूग्णालयात मात्र याविरूद्ध स्थिती आहे. याठिकाणी रूग्णालय तर आहे पण रूग्णालय मुलभुत सेवा सुविधांपासुन बिमार आहे. रूग्णालयात फॅन (पंखा) ची दांडी असून त्यातुन पंखा मात्र गायब आहे, तसेच रूग्णांना सलाईन लावल्यानंतर लावण्यात येणार्या पटटी च्या जागी रूग्णाच्या नातेवाईकांना सलाईन ची सुई पकडून ठेवण्यासाठी सांगीतल्या जात असल्याचे प्रत्यक्षदर्शी दिसले. याबाबत संबंधित डाॅक्टरांना विचारणे केली असता डाॅक्टरांचा अभद्र व उद्धट व्यवहार रूग्णाच्या नातेवाईकांना दुखावणार असतो . यावर संबंधितांनी त्वरित लक्ष घालुन दोषींवर कडक कारवाई करावी, अशी मागणी भिसीवासियांनी केली आहे.*
0 comments:
Post a Comment