दिवसे यांच्या पाळीव गाईचे दूध पितात बकरीचे पिल्लू, ताडाळी येथील प्रकार!
चंद्रपूर. मायेचे वात्सल्य व प्रेम हे कुणाला चुकले नाही. असाच एक प्रकार ताडाळी येथील सुधाकर पांडुरंग दिवसे त्यांचे घरी पाहण्यास मिळत आहे. यांचे घरी पाळीव एक गाय व बकरी पाळण्यात आली आहे. त्या बकरीला दोन पिल्ले असून ते पिले आठ-दहा दिवसांपासून गाईचे आळीपाळीने दूध पीत असतात. हा प्रकार सतत सुरू असताना सुद्धा ती गाय आपलेच वासरू समजून त्या बकरीच्या पिल्लांना दूध पाजत असते. त्या गाईला सुद्धा एक वासरू असून सुद्धा तिच्या बकरीच्या पिल्लांना आपले दूध पाजत असल्याचा प्रकार चक्क अनुभवला आला. मायेची ममता ही सर्वांनाच असते. हे एकदा मुख्या जनावराच्या प्रेमातून दिसून आले.
0 comments:
Post a Comment