Ads

भद्रावती येथे श्री संत नगाजी पुण्यतिथी महोत्सव,भव्य शोभायात्रेचे आयोजन तसेच नवीन कार्यकारणीची निवड!


भद्रावती येथे श्री संत नगाजी
 पुण्यतिथी महोत्सव,भव्य शोभायात्रेचे आयोजन
       तसेच नवीन कार्यकारणीची निवड!
भद्रावती -  श्री संत नगाजी महाराज पुण्यतिथी महोत्सव दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा भद्रावती नाभिक समाजाच्या वतीने दिनांक 14 व 15 ऑक्टोंबर 2019 सोमवार व मंगळवार ला स्थळ श्री संत नगाजी महाराज मंदिर नगाजी नगर येते संपन्न होत आहे.  या दोन दिवसीय  होणाऱ्या पुण्यतिथी महोत्सवात विविध कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.  मात्र यावर्षी नाविन्यपूर्ण अशी भद्रावती शहरात नगाजी महाराजांची भव्य शोभायात्रा व पालखी  सोहळा निघणार आहे. कार्यक्रमात जाहीर कीर्तन, गोपाल काला, सत्कार समारंभ, व गुणवंताचा सत्कार सोहळा, प्रबोधनात्मक व्याख्यान, शेवटी  महाप्रसादाच्या कार्यक्रमाने सांगता होणार आहे.
 या पुण्यतिथी महोत्सव  प्रित्यर्थ होणाऱ्या कार्यक्रमासाठी  पुरुष व महिलाची नवीन कार्यकारणी गठित करण्यात आली. अध्यक्ष बंडूभाऊ व्ही. लांडगे, कार्याध्यक्ष निलेश देवईकर,  सचिव  सचिन नक्षीने, उपाध्यक्ष बाबुरावजी जुंनारकर, अंकुश दरवे,  कोषाध्यक्ष भाऊरावजी दैवलकर,  सतीश जांभुळकर,  सहसचिव रवींद्र हनुमंते ,  सुरेश जमदाडे,  संघटक सागर घुमे,  आशिष चौधरी,  हनुमान नक्षीने,
 महिला कार्यकारिणी अध्यक्ष सौ.  मायाताई चिंचोळकर,  कार्याध्यक्ष सौ. नंदिनीताई लांडगे,  सचिव सौ. वर्षाताई वाटेकर, उपाध्यक्ष  सौ. छायाताई जमदाडे,  कोषाध्यक्ष  सौ. स्मिता नागपूरकर, सहसचिव सौ. योगिता सैदाने, अशा प्रकाराने दोन्ही कार्यकारिणी घोषित करण्यात आले आहेत. तर सदस्य , सल्लागार ,व्यवस्थापक म्हणून नाभिक समाजातील सन्मानीय सदस्याची निवड करण्यात आली आहे. तरी होणाऱ्या पुण्यतिथी महोत्सवास सर्व नाभिक समाज बांधवांनी हजर राहण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment