सुंदर विचार समाजात रुजविण्याच्या
कार्यात योग्य समित्यांनी पुढे यावे : ना. सुधीर मुनगंटीवार
चंद्रपूर दि 14 सप्टेंबर : फिट इंडिया हे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे कार्य योग्य चळवळीच कार्य असून तेच कार्य आपण गावागावात पोहोचून सकारात्मक व सुंदर विचार करणाऱ्या समाज निर्मितीच्या कार्यात स्वतःला वाहून घ्यावे, असे आवाहन राज्याचे वित्त, नियोजन, वने मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज येथे केले
स्थानिक पतंजली योग समितीमार्फत आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. डॉ. शामा प्रसाद मुखर्जी वाचनालयामध्ये आयोजित या कार्यक्रमात योग साधना करणाऱ्या अनेक समित्यांना स्पीकर्सचे वाटप करण्यात आले.
यावेळी त्यांनी करो योग रहो निरोग, या वाक्याचा पुनरुच्चार करताना चंद्रपूर जिल्ह्यामध्ये ही मोहीम अतिशय प्रभावीपणे राबवून सर्वसामान्य नागरिकांचा मार्ग योग समितीकडे वळवा. हॉस्पिटलच्या मार्गाला त्यांना जाऊ देऊ नका, असे आवाहन देखील केले. जिल्ह्यामध्ये आरोग्य सेवेकडे आपण विशेष लक्ष देत असलो तरी जिल्ह्यातील हॉस्पिटलमध्ये जनतेला जावेच लागू नये अशा पद्धतीच्या निरोगी आयुष्याची सुरुवात, योग्य समित्यांमार्फत घराघरात व्हावी, अशी अपेक्षा देखील त्यांनी यावेळी व्यक्त केली. यावेळी उपस्थित महिला पतंजली योग समिती व पतंजली योग समितीच्या सदस्यांना त्यांनी लाऊडस्पीकर्सचे वाटप केले व त्यांच्या सोबत छायाचित्र सुद्धा काढले.
यावेळी व्यासपीठावर बल्लारपूर नगराध्यक्ष हरीश शर्मा पतंजली योग समितीचे मंडळ प्रभारी राजकुमार पाठक, विमल कासटीया, रमेश कासुळकर, हेमंत मल्लेरवार, ज्योतीताई मसराम, अनिल बंडीवार, प्रकाश धारणे, सुधा साधनकर ,परिनीती जयस्वाल, अशोक संगीडवार आदींची
0 comments:
Post a Comment