Ads

९कोटी रूपयांच्या विकास कामांचा भुमिपूजन सोहळा


चंद्रपूर शहर विकासकामांच्या दृष्टीने आदर्श ठरेल याकरीता आम्ही कार्यरत - मा. पालकमंत्री श्री. सुधीर मुनगंटीवार

मनपाचा नागरी दलित वस्ती सुधार योजनामहाराष्ट्र  नगरोत्थान महाभियान निधी योजना व मनपा निधी अंतर्गत ९ कोटी रुपयांच्या विकास कामांचा भूमिपूजन सोहळा  

चंद्रपूर १५ सप्टेंबर  -  ५० वर्षात जी विकासकामे झाली नसतील ती करण्याचा  प्रयत्न आम्ही मागील ५ वर्षात केला आहे.  या  ५ वर्षांच्या अनुभवाने आगामी ५ वर्षात अशी विकासकामे  करू की जनतेला त्यांनी  केलेली निवड सार्थ वाटेल. आपले चंद्रपूर शहर संपूर्ण जगात विकासकामांचा आदर्श ठरेल व शहराचा गौरव वाढेल या दृष्टीने आम्ही आगामी काळात कार्य करणार असल्याचे  प्रतिपादन मा. पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी १५ सप्टेंबर रोजी चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या नागरी दलित वस्ती सुधार योजनामहाराष्ट्र  नगरोत्थान महाभियान निधी योजना व मनपा निधी अंतर्गत केल्या जाणाऱ्या विकास कामांच्या भूमिपूजन सोहळ्यात केले. 

    चंद्रपूर शहर महानगरपालिकेतर्फे नागरी दलित वस्ती सुधार योजनामहाराष्ट्र  नगरोत्थान महाभियान निधी योजना व मनपा निधी अंतर्गत विकास कामांचा भूमिपूजन सोहळा आयोजित करण्यात आला होता.  यावेळी चंद्रपूर विधानसभा क्षेत्राचे आमदार नानाभाऊ शामकुळे,  महापौर सौ. अंजलीताई घोटेकरआयुक्त श्री.  संजय काकडे,उपमहापौर अनिल फुलझेलेस्थायी समितीचे अध्यक्ष राहुल पावडेसभागृह गटनेते वसंता देशमुखमहिला व बालकल्याण सभापती शितल गुरनुलेसभापती कल्पना बगुलकरसभापती सुरेश पचारेसभापती प्रशांत चौधरीउपसभापती चंद्रकला सोयामसर्व नगरसेवकनगरसेविका   प्रामुख्याने उपस्थित होते.           

     याप्रसंगी बोलतांना मा. पालकमंत्री म्हणाले की,गेल्या ५ वर्षात आमदार नानाभाऊ शामकुळे यांच्या नेतृत्वात  मागील ५० वर्षात जी विकासकामे झाली नसतील ती करण्याचा आम्ही प्रयत्न केला. आगामी ५ वर्षातही अशीच  कामे करू की जनतेला त्यांनी केलेली निवड सार्थ वाटेल. आपल्या जिल्ह्यात  मेडिकल कॉलेजकॅन्सर हॉस्पिटलशिर्डी संस्थानाच्या माध्यमातून एमआरआय मशीन उभारण्यात येत आहे. विविध प्रभागात रस्त्यांची कामे सुरु आहेत. अमृत योजनेचेही  काम सुरु आहे,योजनेत होणाऱ्या खोदकामांमुळे जनतेला त्रास होतो याची आम्हाला जाणीव आहेविकास कामे होतांना काही दिवस त्रास होतोच मात्र चंद्रपूरची जनता ज्या सहनशीलतेने विकासकामांसाठी त्रास सहन करून आम्हाला जी साथ देते आहे त्याबद्दल सर्वांचे आभार मानतो.  शहरात बाबुपेठ येथील स्व. अटलबिहारी वाजपेयी स्टेडीयमअभ्यासिका,स्टेडियमचे नूतनीकरणाचे काम सिमेंटचे रस्तेमुंबई येथील सी लिंक पुलाच्या धरतीवर दाताळा पूलाचे काम सुरु आहेओपन स्पेस विकसित करण्याचे कामरोजगारासाठी सैनिकी शाळा इत्यादी विविध उपक्रम सुरु केले गेले आहेत. बाबुपेठ पुलाचे काम जे आजपर्यंत कुठलेही सरकार करू शकले नाही ते आम्ही सुरु केले आहे.  आवाज दो योजना१९२६ टोल फ्री क्रमांक,  मिशन शोर्य यासारख्या चंद्रपूर जिल्ह्यातील योजना देशभरात रोल मॉडेल म्हणून राबविल्या जाणार आहेत.

     देशातील ८५०० रेल्वे स्टेशनपैकी चंद्रपूरचे रेल्वे स्टेशन १० लाखाचे बक्षीस मिळविणारे उत्कृष्ट रेल्वे स्टेशन म्हणून गौरविण्यात आले आहे. आगामी काळात महानगरपालिकेच्या शाळा उच्च प्रतीचे शिक्षण देणाऱ्या शाळा बनणार आहेत ज्यायोगे विद्यार्थ्यांना कॉन्व्हेंटमधे घालणारे पालकही मनपा शाळांनाच पसंती देतील. आज परम महासंगणकाचे जनक असलेले  पद्मश्री डॉ. विजय भटकर यांनीही चंद्रपूर शहरात सुरु असलेल्या विकासकामांची स्तुती केली आहे. अन्न वस्त्र निवारा शिक्षण रोजगार आरोग्य हा आपल्या सर्वांचा अधिकार आहे मात्र दुर्दैवाने स्वातंत्र्याच्या इतक्या वर्षानंतर सुद्धा अनेक परिवारांना मूलभूत गरजा भागविणे शक्य झालेले नाही. अनेक कुटुंब आजही बेघर आहेत. २०२२ पर्यंत बेघर असणाऱ्या सर्वांना घरे देण्याचा मा.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा संकल्प आहे. या संकल्पाला अनुसरून चंद्रपूर शहर महानगरपालिकेने पालिका हद्दीतील बेघरांना घरे देण्याची प्रक्रिया राबवायला सुरवात केली आहे. जो कोणी बेघर असेल त्यांना आगामी ५ वर्षात घरे देणारच. अमृत योजनेच्या माध्यमातून घरोघरी पाण्याची व्यवस्था होणार आहे. 

    या भूमिपूजन सोहळ्यात ९ कोटी रुपयांच्या विकासकामांना प्रारंभ करण्यात आला यात प्रामुख्याने संत कंवरराम चौक ते जुना वरोरा नाकापर्यंत सिमेंट रस्ता,  जटपुरा प्रभाग क्र. ७ मधे दादाजी चावरे ते फारुख कुरेशी यांच्या घरापर्यंत काँक्रीट रस्ताजटपुरा प्रभाग क्र. ७ मधे चावला बेकरी ते मोहन तलरेजा यांच्या घरापर्यंतरबर कोटिंग पेव्हर ब्लॉकचे कामसंविधान चौक तुकूम  ते छत्रपती मेडिकल चौक पर्यंत सिमेंट काँक्रीट रस्ता व विद्युत पथदिवे लावणेसीएचएल हॉस्पिटल ते चव्हाण कॉलनी पर्यंत सिमेंट काँक्रीट रस्ता बनविण्याच्या इत्यादी कामांचे भूमिपूजन करण्यात आले. 

    यावेळी मा. आमदार श्री. नानाभाऊ शामकुळे व मा. महापौर सौ. अंजली घोटेकर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.

याप्रसंगी महानगरपालिकेचे अधिकारी-कर्मचारी  तसेच शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment