राष्ट्रवादी कांग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस तथा राजुरा विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार सुदर्शन निमकर हे राष्ट्रवादी ला चिडून भारतीय जनता पार्टीत प्रवेश घेण्याचा निर्णय घेतला असून राजुरा येथे प्रचारासाठी येत असलेले गृहमंत्री अमित शहा यांचे उपस्थितीत जाहीर प्रवेश घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र काल भाजपचे सुधीर मुनगंटीवार, माजी खासदार हंसराज अहीर, आणि राजूराचे आमदार संजय धोटे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या शेकडो कार्यकर्त्यांनी भाजप मध्ये प्रवेश केला. यांच्या सोबत गडचांदूर येथील नगराध्यक्षा सौ. विजयालक्ष्मी डोहे, राष्ट्रवादी काँग्रेसचे तिन नगरसेवक यांच्या सह शेकडो कार्यकर्त्यांनी भाजप मध्ये प्रवेश केला.
राष्ट्रवादीत इतके वर्ष काम केल्यानंतर यावेळी तरी राजुरा विधानसभा क्षेत्रात राष्ट्रवादी चे वाट्याला उमेदवारी मागितली होती परंतु याची दखल घेतली नसल्याने अखेर नाराज होऊन कार्यकर्त्यांशी चर्चा करून अखेर भाजपात जाण्याचा निर्णय घेतल्याचे सुदर्शन निमकर यांनी आज राजुरा येथे घेतलेल्या पत्रकार परिषद सांगितले
यावेळी शेकडो कार्यकर्त्या सोबत उत्तम मोहितकर,केशव ठाकरे,रामभाऊ देवाईकर,संजय वडस्कर,पुरुषोत्तम अस्वले,हरिदास झाडे,नितीन बाबरत्कर,बाबुराव बोनडे, आदित्य भाके आदी कार्यकर्ते उपस्थित होते

0 comments:
Post a Comment