विकासाचा नावावर बाता मारणाऱ्याआमदारांवर
किशोर जोरगेवार यांची आख पाखड!
चंद्रपूर - मागील दहा वर्षापासून चंद्रपुरात भाजपाचे आमदार नानाभाऊ शामकुळे असून आतापर्यंत केलेल्या कामाचा गवगवा केला. पण चंद्रपूर विधान परिषद क्षेत्रामध्ये कुठलेही काम न केल्याचा दावा हा चंद्रपूरातील जनतेसाठी फोल ठरला आहे. असा दावा चंद्रपूर विधानसभा करीता उभे असलेले अपक्ष उमेदवार किशोरभाऊ जोरगेवार यांनी पत्रकार परिषद मध्ये स्थानिक आमदारांवर चांगली आख पाखड केली आहे. शहरातील विविध भागातील पाणी पुरवठा, चंद्रपूरातील रस्ते, बेरोजगारी, जिल्हात वाढते प्रदुषण, कुठल्याही औद्योगिक विकास झाला नाही, जटपुरा गेट च्या सौंदर्यीकरण गेटवर होत असलेली वाहतुकीची कोंडी, मजबूत बांधकाम पाडून नवीन बांधकाम करण्याचा उपद्रव हा सारा उपक्रम जनतेच्या पैशाची लूट करण्यात आली. चंद्रपूरची ब्लू प्रिंट दाखवण्याचा फसवा उपक्रम ठरला .दारूबंदी ही जिल्ह्यासाठी एक डोकेदुखी ठरली दाताळा नदीवर होत असलेल्या पुलाचे बांधकाम,. प्रियदर्शनी हॉल मध्ये झालेले बांधकाम, तसेच जिल्ह्यातील अनेक कंपन्या बंद झाल्या असून याचा फटका कामगार वर्गावर जास्त प्रमाणात झाला आहे. वाढती महागाई, त्या मुळे कुटुंबाचे आर्थिक बजेट वाढ झाली आहे. अशा अ
नेक समस्यावर जोरगेवार यांनी चंद्रपूर व बल्लारशाच्या आमदाराला खुला मंचावर चर्चा करण्यासाठी आव्हान केले आहे.
आपण विधानसभाक्षेत्रात या साठी उभा होत की, आतापर्यंत चंद्रपूरच्या जनतेने अनेक समस्यांना तोंड द्यावे लागले. चंद्रपुरात पावर प्लांट असताना मात्र येथील स्थानिक लोकांना विद्युत ही भरमसाठ महागात घ्यावे लागत आहे. त्यासाठी आपण दोनशे युनिट विद्युत मोफत देण्याचे ध्येय धोरण आखले आहे. शेतकरी बांधवांसाठी वीज मोफत, उद्योगांना सवलती दरात वीज उपलब्ध करून देणे, ईरई धरणातील पाणी प्रथम शहरातील जनतेला उपलब्ध करून देणे, शहरी व ग्रामीण रुग्णालय अत्याधुनिकीकरण करणे, ऑटो चालकांना आरोग्य सुविधा उपलब्ध करून देणे, नजूलच्या जागेवर बसलेल्यांना घराचे पट्टे देणे, चंद्रपूर शहरातील जनता वेषण , ड्रग्जच्या आहारी गेल्यामुळे अनेक युवकाचे जीवन उद्ध्वस्त झाले आहे, महापरीक्षा पोर्टल बंद करण्यास साठी सरकार दरबारी आपल्या सर्व समस्या निवारण करणार आहे. असे आयोजित झालेल्या पत्रकार परिषद आपल्या जाहीरनाम्यात अपक्ष उमेदवार किशोर जोरगेवार यांनी यांनी म्हटले. यासाठी आपल्याला चंद्रपूर विधानसभा क्षेत्रातील मतदान देऊन विधान भवनात पाठवतील हीच आपल्या मार्फत जनतेला सांगू इच्छितो.
0 comments:
Post a Comment