Ads

आयुक्त साहेब, खुशाल पाणी कर वसूल करा, पण शहरवाशियांना दररोज पाणी देता का?

चंद्रपूर मनपा आयुक्तांच्या आदेशाने शहरवाशीय संतापले? 

आयुक्त साहेब, खुशाल पाणी कर वसूल करा, पण शहरवाशियांना दररोज पाणी कुठे मिळतंय ?

चंद्रपूर वि.प्र. 

चंद्रपूर शहराला उज्वला कन्स्ट्रक्शन या कंत्राटी कंपनीला शहरवाशीयांना पाणी पुरवठा करण्याचे कंत्राट सन २०११ ला चंद्रपूर नगरपरिषद तर्फे देण्यात आले होते.मात्र सन २०१२ मधे नगरपरिषदचे रूपांतर महानगरपालिकामधे झाल्या नंतर तेच कंत्राट सुरू राहिले नव्हे ते आता एक महिन्यांपूर्वीपर्यंत सुरू होते. या दरम्यान चंद्रपूर शहरवाशीयांच्या जवळपास हजारो तक्रारी मनपा आयुक्त यांचेकडे आल्या असेल की आम्हच्याकडे साहेब पाणी येत नाही. पण केवळ पाणी बैठकीचे फार्स आटोपून कंत्राटदाराला सूचना देण्यापलीकडे आयुक्तांनी काहीच साध्य केलं नाही आणि इक्का दुक्का पाण्याचा प्रश्न मार्गी लागला असेल पण बहुतांश प्रश्न हे आजही जसेच्या तसेच आहे.मग आयुक्त साहेब आज तुम्ही त्या पाणी पुरवठा कंत्राटदाराकडून कंत्राट काढल्यानंतर पाणी पुरवठा दररोज होतं आहे का ? याची समीक्षा केली आहे का ? अर्थात याचे उत्तर नाहीच असे येईल. मग कुठल्या तोंडाने म्हणताय की शहरवाशीयांकडून कर वसुली करा ? असा सवाल आता नळ ग्राहक करीत आहे.

दोन वर्षांपूर्वी चंद्रपूरच्या नियोजन भवन येथे तत्कालीन पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली पाणी प्रश्नावर बैठक बोलावण्यात आली होती त्यावेळी कंत्राटदार योगेश समरीत आणि आयुक्त संजय काकडे हे सुद्धा उपस्थित होते. त्यावेळी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी कंत्राटदार यांचेसह आयुक्तांना तंबी दिली होती की पाणी प्रश्न हा जनतेच्या दैनंदिन जीवनाचा प्रश्न आहे. त्यामुळे दररोज पाणी पुरवठा करा आणि जर तुम्ही केला नाही तर तूम्हचेवर सुद्धा गुन्हा दाखल होऊन करवाई होईल. अर्थात जनतेसमोर पालकमंत्री बरगळले असले तरी जनतेसमोर आयुक्तांना खरी खोटी ऐकवून एक प्रकारे आयुक्तांची इज्जतच घालवली होती. पण दुर्भाग्य असं की त्यानंतर सुद्धा पाणी पुरवठा सुरळीत झाला नाही आणि तो आज पण सुरळीत नाही.खरं तर चंद्रपूर शहरवाशीयांना दररोज पाणी पुरवठा करण्याचा पाणी कर महानगरपालिका तर्फे लावल्या जातो मग ज्याअर्थी मनपाकडून किंव्हा कंत्राटदार यांचेकडून पूर्ण दिवस पाणी पुरवठाच झाला नाही मग शहरवाशीयांनी पूर्ण पाणी कर द्यायचा तो कसा ? हा प्रश्न सुद्धा महत्वाचा आहे.

पाणी बैठकीत काय म्हणाले आयुक्त ! आणि काय आहे उपाय !

मालमत्ता कर आणि पाणीपट्टी कर वसुलीचा वेग वाढविण्याच्या दृष्टीने नियोजन करण्याचे कडक निर्देश महापालिका आयुक्त संजय काकडे यांनी २७ नोव्हेंबर रोजी झालेल्या पाणीकर व मालमत्ता कर वसुली आढावा सभेत दिले. बुधवारी महानगरपालिका अधिकाऱ्यांच्या आढावा बैठकीत बोलताना आयुक्त यांनी मालमत्ता कर आणि पाणीपट्टी कर वसुलीचा आढावा घेतानाच वसुली करण्याच्यादृष्टीने नियोजन करण्याचे व विशेष वसुली मोहीम राबविण्याबरोबरच वेळप्रसंगी कडक कारवाई करण्याच्या सूचनाही त्यांनी सर्व अधिकाऱ्यांना दिल्या.
दरम्यान महानगरपालिकेकडून पाणीपुरवठा होणाऱ्या पाइपलाइनमधून मोटार पंपाच्या माध्यमातून पाणी उपासण्याचे प्रकार आढळून आल्यास मोटार जप्तीची कारवाई मनपातर्फे राबविण्यात येणार आहे. शहरातील थकबाकीदारांची यादी तयार करून त्यांच्याकडून वसुली करण्याला प्राधान्य देण्याच्या सूचना संबंधित बैठकीत देण्यात आल्या. पाणीपुरवठा खंडीत करण्याची कारवाई टाळण्यासाठी थकबाकीदारांनीं वेळेच्या आत थकीत रकमेचा भरणा करण्याचे आवाहन चंद्रपूर शहरवाशीयांना त्यांनी केले. याप्रसंगी उपायुक्त गजानन बोकडे, सहायक आयुक्त धनंजय सरनाईक, शीतल वाकडे, सचिन पाटील, शहर अभियंता महेश बारई, मनोज गोस्वामी, उपअभियंता विजय बोरीकर, अधिकारी, कर विभाग व पाणीपुरवठा विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.

Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment