चंद्रपूर शहरालगत ताडोबा बफर झोन परिक्षेत्रात येणाऱ्या जुनोना गावात काल रात्री गुप्तधनाकरिता लहान मुलाचा नरबळी देण्याच्या प्रयत्न नागरिकांच्या सतर्कतेमुळे उघडकीस आला.धक्कादायक म्हणजे गावातील पोलीस पाटीलांचे वडील नत्थू औरसे या सर्व प्रकाराला संचालित करताना आढळल्याने या घटनेने रात्रभर गावात खळबळ माजली. तात्काळ पोलिसांनी घटनास्थळ गाठत परिस्थितीवर नियंत्रण मिळविले असून अधिक तपास सुरु आहे.
दिनांक 30 नोव्हेंबर 2019 रात्री जुनोना गावातील हिवरे यांच्या शेतातील घरी रात्री 9:30 ते 10 वाजता च्या दरम्यान लगबग आढळून आल्याने गावातील काही नागरिकांना गडबड असल्याची शंका आली. आणि गावातील नागरिकांनी केला गुप्ता धनाचा, नरबळीचा भांडाफोड.
त्यानंतर काही सतर्क नागरिकांनी घराच्या आडोश्याला राहून नेमका काय प्रकार आहे जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता अचानक त्यांना विविध तंत्र मंत्रवत आवाज येऊ लागले, व लहान मुलाचा रडण्याचा आवाज सतत येत होता. त्यानंतर नारळे फोडण्यात आली व बळी देण्याचे शब्द कानावर येताच या मंडळींनी लगेच रूम चे दार उघडून आत शिरल्यावर आतील चित्र बघून हा गुप्तधनाकरिता नरबळीचा प्रयत्न असल्याचे उघड झाले.
गावकऱ्यांच्या माहिती नुसार घटनास्थळी 3 इसम व एक महिला सोबत एक लहान मूल होते. गावकऱ्यांनी धाबा दणानताच सोबत असलेल्या महिलेने गावकऱ्यांवर स्त्रीत्वाचा फायदा घेत आरडाओरडा सुरु केला या गडबडीत दोन पुरुष लहान मुलाला घेऊन पळून जाण्यात यशस्वी झाले व धक्कादायक म्हणजे या सर्व प्रकारात गावातील पोलीस पाटील जयपाल औरसे यांचे वडील नत्थू औरसे सामील असून ते गावकऱ्यांना वारंवार विघ्न न आणण्यासाठी विनवणी करीत होते.
घटनास्थळी आढळलेल्या साहित्य व लहान मुलाची उपस्थिती व घटना उघडकीस आल्यानंतर त्या मुलाला पळवून नेने हा संपूर्ण घटनाक्रम लक्ष्यात घेता, हा नरबळी देण्याचा असू शकतो याची सखोल चौकशी करून आरोपीना अटक करण्याची मागणी जुनोना गावकऱ्यांनी केली आहे.
About The Chandrapur Times
यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।
0 comments:
Post a Comment