दि २१/०२/२०२०रोजी वेळ ४-३० वाजता कोरपना बस स्टाप येथे एस टि चे सुरक्षा व दक्षता पथक आले आणि त्यांनी  बिना तिकीट प्रवास चेकिंक सुरुवात केली असता त्यामधे त्यांनी दारू पकडली. आदिलाबाद ते चंद्रपूर बस क्रमांक एम एच- ०७ एच जी ८२२५ ला कोरपना येथे तिकिट तपासणी पथकाने तिकीट तपासताना बसमध्ये १७ प्रवासी होते तसेच एस टि च्या कॅबिन मध्ये सामानाची तपासणी करुन विचारपुस केली असता चालकाच्या आसनाच्या मागे एका पिशवीत दारु असल्याचे आढळून आले . सदर दारुची पिशवी एस टि चालक विक्की भानुदास बरडे बिल्ला क्र ९४४५ रा चंद्रपूर बस मध्येदारु तस्करी करित असल्याचे सुरक्षा व दक्षता पथकाच्या लक्षात आले व एस टि चालका विरोधात कोरपना पोलिस स्टेशन मध्ये तक्रार केली विदेशी दारु आय बि १८० मिलिच्या ७१ बाटल एकूण किमत९९४० रुपये जप्त करुन एस टि बस चालक बरडे च्या विरोधात अ प्र क्र ३६/२० कलम ६५ (आ )(इ )म दा का गुन्हा दाखल झाला आहे.

ही  कार्यवाही एस टि महामंडळाचे सुरक्षा व दक्षता पथकाचे अधिकारी श्री कानफाडे याच्या मार्गदर्शनात कु वैशाली एम बुच्चे सुरक्षा निरीक्षक विभागीय कार्यालय चंद्रपूर. भारत राजेश्वर भुपाल राखन व पहारा मिरीक्षक श्री. विलास गोड्रालवार वाहतुक निरीक्षक श्री.राजु उपरे चालक व दक्षता वाहक याच्या सर्तकतेने झाली