चंद्रपूर मनसेने अशियाना बाल सदन मधे साजरा केला वर्धापन दिन !
आगळा वेगळा उपक्रम:-
चंद्रपूर प्रतिनिधी :-
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या चौदाव्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून मनसे पदाधिकाऱ्यांनी रेड लाईट एरिया मधील अनाथ मुलांचे संगोपन करणाऱ्या अशियाना बाल सदन वांढरी येथे मुलांना केक भरवून व त्यांना भोजन देवून वर्धापन दिन साजरा केला. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे दरवर्षी पक्षाचा वर्धापन दिन मोठ्या थाटात साजरा केल्या जातो.परंतु या वेळी चिन देशासह जगातील अनेक देशात आणि महाराष्ट्रातील चंद्रपूर जिल्ह्यात कोरोना व्हायरसच्या संभावित धोक्यांच्या शक्यतेने काल दिनांक ८ मार्च या जागतिक महिला दिनी शहरातील कचरा संकलन करणाऱ्या महिला कामगारांना मास्क आणि हँडक्लोज वाटप केले होते आणि त्यांचा सत्कार केला होता व आज दिनांक ९ मार्च पक्षाच्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून अनाथ मुलांना केक भरविण्यात आला व सोबतच त्यांना पौष्टिक असे जेवन देण्यात आले, यावेळी आशियाना बाल सदन च्या संचालिका सोनकुसरे ह्या उपस्थित होत्या. या कार्यक्रमाचे आयोजन मनविसे जिल्हाध्यक्ष राहुल बालमवार, उपाध्यक्ष राजू कुकडे, जिल्हा उपाध्यक्ष सचिन भोयर. शहर अध्यक्ष मनदीप रोडे, तालुका सचिव मनोज तांबेकर, तालुका अध्यक्ष प्रकाश नागरकर, मनविसे तालुका अध्यक्ष विवेक धोटे, तरंग नायर, सतीश वाकडे, सुमीत करपे.इशांत शेख, तुषार येरमे.महिला सेनेच्या अध्यक्षा सुनीता गायकवाड, महेश वासलवार इत्यादींनी केले, या प्रसंगी सर्वानी सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या कार्याला यश यावे याकरिता अनाथ मुलांनी प्रार्थना केली.व मनसेच्या वर्धापन दिनाचा आनंदोत्सव साजरा केला.
0 comments:
Post a Comment