बाहेरून येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचे वाहनाचे निर्जंतुकीकरण आवश्यक : जिल्हाधिकारी
३० एप्रिलपर्यंतच्या लॉकडाऊनसाठी जिल्हा प्रशासन सज्ज
✨सीमावर्ती भागातील गावे रस्ते कडेकोट बंदोबस्तात
✨ जिल्ह्यात एकही ही पॉझिटिव्ह रुग्ण नाही
✨ पोलिसांसाठी निर्जंतुकीकरण वाहन तयार
✨ विनाकारण फिरणारे 243 वाहने जप्त
✨ 102 नागरिकांवर पोलिसांकडून केसेस
✨ वाहनधारकांकडून पाच लाखावर दंडवसुली
✨ अन्य राज्यातील 642 नागरिक निवार्यामध्ये
✨ कम्युनिटी किचन मार्फत 17 हजार फूट पॅकेजचे वाटप
✨ सर्दी खोकला असल्यास शासकीय दवाखान्यामध्ये संपर्क साधा
✨ आता बाहेरून कोणी आल्यास होम कॉरेन्टाईन अनिवार्य
✨ सीमेलगतच्या गावांमध्ये येणाऱ्या प्रत्येकाची माहिती द्या
✨ जिल्ह्यातील कंट्रोल रूमशी संपर्क साधा
चंद्रपूर दि ११ एप्रिल : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केल्याप्रमाणे आता 14 एप्रिल ही मर्यादा वाढवून 30 एप्रिल पर्यंत राज्यात लोक डाऊन सुरू राहणार आहे यासाठी चंद्रपूर जिल्हा प्रशासन तयार असून नागरिकांची कुठली ही गैर व्यवस्था होणार नाही याबाबतच्या उपाययोजना करण्यात येत आहे. सध्या जिल्ह्यात एकही रुग्ण पॉझिटिव्ह नाही. त्यामुळे येणाऱ्या काळात जिल्ह्यात येणारे प्रत्येक वाहन प्रत्येक व्यक्ती तपासली जाईल व त्याचे निर्जंतुकीकरण केले जाईल. सोबतच सीमावर्ती भागांमध्ये जिल्ह्यातील नागरिकांनी स्वतः दक्ष राहून बाहेरून येणाऱ्या नागरिकांची माहिती द्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी केले आहे.
राज्य शासनाने 30 एप्रिल पर्यंत लॉक डाऊन वाढवण्याचा निर्णय घेतला आहे त्यामुळे या काळात आवश्यक असणारी जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा, अडकून पडलेल्या नागरिकांना निवारा, बेघर,निराश्रित व व विमनस्क लोकांना रोजचे भोजन, जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था व आरोग्य यंत्रणाआणखी नियोजन बद्ध करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
दरम्यान जिल्हा आरोग्य यंत्रणेकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार सध्या 28 नागरिकांची वैद्यकीय तपासणी झाली असून त्यातील 26 लोकांचे नमुने घेण्यात आले आहे. त्यापैकी 25 नागरिकांचे नमुने निगेटिव असून 2 दोन नमुने प्रतीक्षेत आहे. आतापर्यंत विदेशातून परत आलेल्या बाहेर राज्यातून बाहेर जिल्ह्यातून आलेल्या नागरिकांची संख्या 26 हजार 663 आहे. त्यापैकी 4 हजार 482 नागरिकांना होम कॉरेन्टाईन करण्यात आले आहे. तर यापैकी 22 हजार 181 लोकांनी 14 दिवस होम कॉरेन्टाईन राहण्याचा कालावधी पूर्ण केला आहे. 30 नागरिकांना इन्स्टिट्यूशनल कॉरेन्टाईन करण्यात आले आहे.
जिल्ह्यामध्ये संचारबंदी लागू असतांना व पूर्णतः लॉक डाऊन करण्याचे निर्देश असताना देखील काही नागरिक विनाकारण घराबाहेर फिरत आहेत. अशा नागरिकांच्या 243 वाहनांना जप्त करण्यात आले आहे. 102 लोकांवर केसेस दाखल करण्यात आल्या असून ५ लाखावर दंड करण्यात आला आहे. नागरिकांनी पुढील काळात घराबाहेर पडू नये, असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी केले आहे.
जिल्ह्यातील पोलिस यंत्रणेवर या काळामध्ये प्रचंड बंदोबस्ताचा तणाव आहे. पोलीस दलाला विविध ठिकाणी कर्तव्य पूर्तीसाठी जावे लागते त्यांच्यासाठी एका निर्जंतुकीकरण वाहनाची व्यवस्था करण्यात आली आहे. नाकाबंदी करणारे कर्मचारी यांना कर्तव्य पूर्ण करताना कोणताही धोका संभवू नये यासाठी ही खबरदारी घेण्यात आल्याचे डॉ. रेड्डी यांनी स्पष्ट केले आहे
जिल्ह्यामध्ये सध्या 642 नागरिक विविध निवारा गृहामध्ये आश्रयास आहेत. त्यांना 30 एप्रिल पर्यंत राहण्याची व जेवण्याची व्यवस्था करण्यात आली आहे .अन्य राज्यात अडकलेल्या नागरिकांनी देखील या काळात आहे तिथेच राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे. शहरामध्ये महानगरपालिकेच्या पुढाकारातून विविध स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने 17 हजारावर नागरिकांना भोजनदान करण्यात येत आहे. आजूबाजूच्या परिसरात कोणीही नागरिक उपाशी असल्यास या संदर्भातील हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधून नागरिकांनी त्याची मदत करावी, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.
प्रशासनातर्फे जारी करण्यात आलेल्या हेल्पलाइन क्रमांकाचा वापर करून आपल्या आजूबाजूच्या नागरिकांना योग्य ती सुविधा उपलब्ध करून द्या, असे जिल्हाधिकार्यांनी केले आहे.
शहरात विविध सामाजिक संस्थांमार्फत सध्या भोजनदान चालू असून नागरिकांनी आपल्या अवतीभवती अशा पद्धतीने कोणाची उपासमार होत असल्यास महानगरपालिकेच्या ०७१७२-२५४६१४ या क्रमांकावर संपर्क साधावा.कॉरेन्टाईन संदर्भात तक्रार अडचणी असल्यास ०७१७२-२५३२७५, ०७१७२-२६१२२६ या क्रमांकावर संपर्क साधावा. उपचार, समुपदेशन, पाठपुरावा, अॅम्बुलन्स हवी असल्यास जिल्हा रुग्णालयाच्या ०७१७२-२७०६६९ या क्रमांकावर संपर्क साधावा. तर रुग्ण, प्रवाशांची चौकशी, शहरी व ग्रामीण भागात अन्नधान्याची कमतरता यासाठी o७१७२-२५१५९७, टोल फ्री क्रमांक १०७७ यावर चौकशी करता येणार आहे. मालवाहतूक करणाऱ्या वाहनचालकांना अडचण असल्यास त्यांनी आरटीओच्या ०७१७२-२७२५५५ या क्रमांकावर फोन करावा. उद्यापासून पालकमंत्री तक्रार निवारण यंत्रणा हॅलोचंदा सुरू होत असून टोल फ्री क्रमांक १५५-३९८ वर दूरध्वनी करावा, असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच अधिकृत माहितीसाठी डिस्ट्रिक कोरोना कंट्रोल सेल या वेबसाईटवर तसेच @InfoChandrapur या ट्विटर हँडलला फॉलो करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
0 comments:
Post a Comment